Prabhas' Upcoming Film Spirit : साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘बाहुबली’ सीरिजनंतर प्रभास देशविदेशात लोकप्रिय झाला. अद्यापही त्याची क्रेझ कायम आहे. प्रेक्षक त्याच्यावर फिदा आहेत. हेच कारण आहे की प्रत्येक निर्माता प्रभासला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक आहे. अगदी प्रभास म्हणेल तेवढी फी देण्यास निर्माते राजी आहेत. म्हणायला, प्रभासचे ‘बाहुबली 2’नंतर आलेले दोन्ही सिनेमे दणकून आपटले. सर्वप्रथम ‘साहो’ फ्लॉप झाला. पाठोपाठ अलीकडे रिलीज झालेला ‘राधेश्याम’ या सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण तरिही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर पुढची बातमी वाचाच...
होय, सध्या प्रभास ‘सालार’ या चित्रपटात बिझी आहे. आता प्रभासने ‘अर्जुन रेड्डी’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga ) यांचा एक सिनेमा साईन केला आहे. या चित्रपटाचं नाव ‘स्पिरिट’ ( Spirit) असल्याचं कळतंय. या चित्रपटासाठी प्रभासने किती फी घेतली माहितीये? तर 150 कोटी.
होय, रिपोर्टनुसार, प्रभासने ‘स्पिरिट’साठी 150 कोटी मानधन घेतलं आहे. ही बातमी खरी असेल तर प्रभास भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात महागडा अभिनेता बनला आहे. आत्तापर्यंत शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान यांनीही इतकं मानधन घेतलेलं नाही. प्रभासचा ‘स्पिरिट’ हा सिनेमा हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, जपानी व कोरियाई भाषेतही रिलीज होणार आहे.प्रभास सध्या ‘सालार’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याशिवाय ओम राऊत यांच्या ‘आदिपुरूष’ या सिनेमातही तो दिसणार आहे. यात सैफ अली खान व क्रिती सॅनन यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
प्रभास नव्हता पहिली पसंतचर्चा खरी माना तर, ‘स्पिरिट’साठी प्रभास हा फर्स्ट चॉईस नव्हता. त्याच्याआधी रामचरणला हा सिनेमा ऑफर झाला होता. त्याने नकार दिल्यावर महेशबाबूला या चित्रपटासाठी विचारणा झाली. मात्र त्यानेही हा सिनेमा नाकारला. यानंतर अल्लू अर्जुनला हा चित्रपट ऑफर केला गेला. मात्र त्याच्याकडूनही नकार मिळाला. सरतेशेवटी प्रभासचं नाव या चित्रपटासाठी फायनल झालं.