बाबा का अहंकार बढ रहा है...पण का? उत्तर हवे असेल तर पाहा, परिणीती चोप्राचा ‘हा’ व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 9:28 AM
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या दोघांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. कसली तर बळाची स्पर्धा. होय, परिणीतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच मजेशीर आहे.
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या दोघांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. कसली तर बळाची स्पर्धा. होय, परिणीतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच मजेशीर आहे. अर्जुन एका जागी उभा आहे आणि परिणीती स्वत:त असली नसली तेवढी ताकद लावून त्याला ढकलतेय. पण अर्जुन आहे की तो इंचभरही जागेवरून हलायला तयार नाही, असे या व्हिडिओत दिसतेय. खरे तर परिणीती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. पण पूर्ण शक्ती वापरूनही अर्जुनला ती जागेवरून एक इंचही हलवू शकत नाही. ‘मी रोज प्रयत्न करते. पण दरवेळी पूर्णपणे अपयशी ठरतेय. कितीही जोर लावला तरी तो जागेवरून इंचभरही हलत नाही. परिणामी बाबा का अहंकार बढ रहा है...पण मी लवकरच यशस्वी होईल,’ असे परिणीतीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे. आता परिणीती अर्जुनने दिलेल्या या चॅलेंजला कसे पूर्ण करते, ते बघूच. ALSO READ : परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!तूर्तास परिणीती व अर्जुन दोघेही ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात बिझी आहेत. विपुल शाह दिग्दर्शित हा चित्रपट यंदा ७ डिसेंबरला रिलीज होतोयं. हा चित्रपट ‘नमस्ते लंडन’चा दुसरा पार्ट आहे. ‘नमस्ते लंडन’मध्ये कॅटरिना कैफ व अक्षय कुमार या जोडीने धम्माल केली होती. आता याच्या सीक्वलमध्ये परिणीती व अर्जुन किती धूम करतात, ते आपण बघणार आहोत. अर्जुन व परिणीती या दोघांनीही चार वर्षांपूर्वी ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. चार वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने चाहते कमालीचे उत्सूक आहेत. ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही ही जोडी एकत्र दिसणार आहे.