वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, सलमान खानची दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 06:52 PM2024-12-09T18:52:30+5:302024-12-09T18:52:47+5:30
वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Baby John Trailer: अभिनेता वरुण धवन याचा 'बेबी जॉन' (Baby John) सिनेमा येतोय. अॅटलीने सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामुळे सिनेमाची चर्चा आणखी वाढली आहे. काही दिवसांपुर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
वरुण धवन रुपेरी पडद्यावर जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये वरुण सोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश, वामिका गब्बी आणि जॅकी श्रॉफ पाहायला मिळत आहेत. जॅकी श्रॉफ हा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. 3 मिनिट 6 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये वरुण धवन एका धाडसी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका पाहायला मिळतोय. जो बलात्कार पीडितांसाठी लढतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो. शिवाय वरुण एक हळवा बाप ही दिसून येतोय. जो आपल्या मुलीच्या सरंक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. ट्रेलरच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये सलमान खानचीही झलक पाहायला मिळतेय. त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आलेला नसला तरी ही काही सेकंदांची क्लिप चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेशी आहे.
आजवर वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. २५ डिसेंबर २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'बेबी जॉन'चा ट्रेलर एकदम हटके असून अल्पावधीत लोकांनी या ट्रेलरला पसंती दिलीय. आता वरुण धवन आणि जॅकी श्रॉफ हे दोघे बॉक्स ऑफिसवर काय धमाका करणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.