वरुण धवनचा बहुचर्चित 'बेबी जॉन' सिनेमा आज ख्रिसमसच्या मुहुर्तावर सगळीकडे रिलीज झालाय. या सिनेमाच्या टीझर, ट्रेलरपासूनच सिनेमाची चर्चा शिगेला होती. अशातच सिनेमातील 'नैन मटक्का' हे गाणंही सध्या सोशल मीडियावर ट्रेडींगवर आहे. 'बेबी जॉन' सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया X वर शेअर केल्या आहेत. कसा आहे सलमान खानचा 'बेबी जॉन'? नेटकऱ्यांना कसा वाटला? जाणून घ्या.
'बेबी जॉन' पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिलंय की, "बेबी जॉन एक मास्टरपीस आहे. हा सिनेमा अपेक्षेपेक्षा प्रेक्षकांमध्ये जास्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय. वरुण धवनच्या करिअरमधील बेस्ट सिनेमा. Atlee सरांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची एक चांगली जागा निर्माण केलीय. साउथ दिग्दर्शक बॉलिवूड हिरोंना चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करण्यात यशस्वी झाले आहेत."
आणखी एका युजरने लिहिलंय की, "वरुण धवन बॅक विथ द बँग! बेबी जॉन सिनेमा रोमान्स, अॅक्शन, ड्रामा, कॉमेडीचा तडका आहे. या सिनेमाचा म्यूझिक अल्बम जबरदस्त आहे. सिनेमातील संवाद तुमच्यापर्यंत अचूक पोहोचतात आणि प्रेक्षकांना निःशब्द करतात. सिनेमातील ट्विस्ट आणि साउंड इफेक्ट हा सिनेमा आवर्जुन पाहण्यास कारणीभूत ठरणार आहेत. मस्ट वॉच सिनेमा."
याशिवाय अनेक प्रेक्षक आणि समीक्षकांनी सिनेमाला ३ स्टार आणि साडेतीन स्टार दिले आहेत. एकूणच ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डोस मिळणार यात शंका नाही.
'बेबी जॉन' सिनेमात अभिनेता वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज पाहायला मिळतोय. आज २५ डिसेंबर २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमात वरुणसोबत वामिका गाबी, किर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय सलमान खान सिनेमात विशेष भूमिकेत असल्याने थिएटरमध्ये प्रेक्षकांचा कल्ला होणार, यात शंका नाही.