Join us

​असा साजरा झाला बच्चन कुटुंबाची ‘प्रिन्सेस’ आराध्याचा वाढदिवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 7:53 AM

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी लाडकी लेक काल म्हणजे १६ नोव्हेंबरला सहा वर्षांची झाली. संध्याकाळी या वाढदिवसाची  ...

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी लाडकी लेक काल म्हणजे १६ नोव्हेंबरला सहा वर्षांची झाली. संध्याकाळी या वाढदिवसाची  पार्टी रंगली. अर्थात आराध्याच्या वाढदिवसाचे कुठलेही ग्रॅण्ड सेलिब्रेशन न करता, बच्चन कुटुंबाने एकत्र येऊन एक लहानशी पार्टी करत आराध्यासोबत क्वालिटी टाईम घालवला. आराध्याच्या वाढदिवशी मुंबईच्या एका हॉटेलात बच्चन कुटुंब डिनर करण्यासाठी पोहोचले.यावेळी मम्मी-पापा ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही आराध्यासोबत होते. आजोबा अमिताभ बच्चन आणि आजी (ऐश्वर्याची आई) वृंदा राय हे सुद्धा यावेळी हजर होते. आराध्याची आजी जया बच्चन या पार्टीत दिसली नाही. कदाचित ती मुंबईत नसावी.या डिनर पार्टीचे काही इनसाईड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कालच्या बर्थ डे पार्टीत गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि त्यावर त्याच रंगाचा हेअरबॅण्ड अशी आराध्या अगदी परिकथेतील सुंदर प्रिन्सेससारखी दिसत होती.  आराध्याची मम्मी अर्थात ऐश्वर्या राय यावेळी निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. या शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य चांगलेच खुलून आले होते.  अमिताभ आणि अभिषेक या दोघांनीही जीन्स आणि झिपरला पसंती दिली होती.   अभिषेक व ऐश्वर्याने २००७ मध्ये लग्न केले. आराध्याचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ साली झाला. खरे तर आराध्याचा वाढदिवस आणखी खास तºहेने साजरा होऊ शकला असता. पण बच्चन कुटुंबाला कुठलाही थाट नको होता. त्यामुळे त्यांनी आराध्याचा वाढदिवस अतिशय सामान्य पद्धतीने साजरा केला. ऐश्वयाचे वडिल कृष्णराज राय यांचे याचवर्षी मार्च महिन्यात निधन झाले. प्रथेनुसार, राय कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत बच्चन कुटुंबाने  यंदा वर्षभर कुठलेही सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा कुठलेही ग्रॅण्ड सेलिब्रेशन झाले नाही. अलीकडे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पाटीर्ही बच्चन कुुटुंबाने टाळली होती. अमिताभ यांच्या वाढदिवसाची पार्टी देण्याऐवजी अख्खा कुटुंबाने मालदीव येथे बिग बींचा वाढदिवस साजरा केला होता.  आता आराध्याचाही वाढदिवस असाच साजरा झाला.