सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी फॅन्स कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. नुकताच महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस झाला. दरवर्षी चाहते त्यांची एक झलक पाहाता यावी यासाठी प्रयत्न करतात. मात्र खूप कमी असे चाहते आहेत. ज्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळते.
अशाच एका जबरा फॅनचा किस्सा सध्या बी टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. बिग बी अमिताभ बच्चन हे देखील ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखोंच्या संख्येत फॅन्स आहेत. मात्र या सगळ्या फॅन्सपैकी एक फॅन अमिताभचा ख-या अर्थाने जबरा फॅन ठरला आहे.
याचं नाव आहे, दिव्येश कुमार. गुजरातच्या सुरतमध्ये राहणारा दिव्येशने अमिताभ यांचे तब्बल 7 हजार फोटो जमा केले आहेत. 1999 सालापासून त्याने अमिताभ यांचं फोटो कलेक्शन सुरू केलं. दिव्येशनने फक्त अमिताभ यांचे फोटो जमवण्याचं काम केलं नाही. तर अमिताभ यांच्या वाढदिवशी तो वृक्षारोपणही करतो.
इतकंच नव्हे तर कुमार यांनी बच्चन त्यांच्याप्रमाणेच अवयवदान करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे एक नाही दोन नाही तर तब्बल दहा वेळा तो अमिताभ यांना भेटला आहे.
मुझसे ना हो पाएगा... म्हणत अमिताभ बच्चन ढसाढसा रडले; पण मेहमूद यांच्या हृदयाला फुटला नाही पाझर
‘बॉम्बे टू गोवा’च्या शूटिंगवेळी अमिताभ सेटवर आले आणि गाणे शूट करायचेय, असे त्यांना सांगण्यात आले. गाणे होते, ‘देखा ना हाय रे सोचा ना’. अमिताभ यांनी या गाण्यावर डान्स करावा, अशी मेहमूद यांची इच्छा होती. अमिताभ यांना ही गोष्ट कळली तेव्हा ते इतके घाबरले की, त्यांना दरदरून घाम फुटला. कसेबसे शूटींग सुरु झाले आणि अमिताभ नाचू लागले. पण अमिताभ यांचे एकही पाऊल ठेक्यावर पडत नव्हते. अनेक रिटके झाले. जणू सेटवरचे सगळे आपल्यावर हसत आहेत, असे वाटून अमिताभ शरमेने लाल झालेत. ते थेट त्यांच्या रूममध्ये गेले. मेहमूद त्यांना सगळीकडे शोधू लागलेत. ते रूममध्ये असल्याचे कळल्यावर त्यांनी काही वेळ प्रतीक्षा केली. पण अमिताभ रूमबाहेर येईनात. मग काय, एका क्षणाला मेहमूद संतापले. ते स्वत: रूममध्ये गेलेत. पाहतात काय तर अमिताभ बेडवर झोपलेले होते आणि त्यांना 102 डिग्री ताप भरला होता.
पण त्याही अवस्थेत मेहमूद यांना पाहून अमिताभ थरथर कापू लागलेत. मेहमूद आपल्याला नाचवूनच सोडतील, या विचाराने ते इतके अस्वस्थ झालेत की, मेहमूद यांच्यासमोर ढसाढसा रडू लागले. इतकेच नाही तर त्यांनी थेट मेहमूद यांचे पाय पकडले. भाईजान, मुझसे डान्स नहीं हो पाएगा, मुझे नाचना नहीं आता, म्हणून विनवण्या करू लागलेत. पण मेहमूद जराही विचलित झाले नाही.