१९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाला रिलीज होऊन आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. अमिताभ बच्चन, गोविंदा, रवीन टंडन आणि राम्या कृष्णन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या ब्लॉकबस्टर सिनेमातील एक सीन अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलाय.
माधुरीने सिनेमातील तो सीन शेअर केलाय ज्या सिनेमाच्या शूटींगला खरा हल्ला समजून अमिताभ आणि गोविंदा फायटींग करू लागतात. या सीनमध्ये बिग बी आणि गोविंदा माधुरीला वाचवत असतात. माधुरीने या सीनचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'बडे मियां छोटे मियांचा हा सीन आजही माझ्या ओठांवर हसू आणतो'. ('या' कारणामुळे माधुरी दीक्षितने कधीच केले नाही अनिल कपूरसोबत काम, दोघांचाही हा सिनेमा ठरला शेवटचा)
माधुरीने लिहिले की, 'अमिताभ बच्चनजी, गोविंदाजी, डेविड धवनजी आणि संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव मजेदार होता'. डेविड धवन यांचं दिग्दर्शन असलेला बडे मियां छोटे मियां हा सिनेमा १६ ऑक्टोबर १९९८ ला रिलीज झाला झाला होता. रूमी जाफरी यांनी लिहिलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन आणि गोविंदा दोघांचाही डबल रोल होता. (का साईन केला ‘साजन’? माधुरी दीक्षितने 29 वर्षांनंतर सांगितले कारण)
हा सिनेमा १९९५ मध्ये रिलीज झालेल्या 'बॅड बॉइज' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक होता. आश्चर्याची बाब म्हणजे या सिनेमाचं बजेट केवळ ९ कोटी रूपये होतं. पण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४२ कोटी रूपयांची कमाई केली होती. यातील अमिताभ बच्चन आणि गोविंदाची जुलगबंदी प्रेक्षकांनी फारच आवडली होती. आजही हा सिनेमा लोक टीव्हीवर आवडीने बघतात.