Join us

'बड़े मियाँ छोटे मियाँ' साठी कोणी किती घेतलं मानधन ? आकडा वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 2:24 PM

'बड़े मियां छोटे मियां' सिनेमासाठी अभिनेत्यांनी तगडी रक्कम घेतली आहे.

खिलाडी कुमार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेल्या 'बड़े मियां छोटे मियां' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अ‍ॅक्शनपट असलेल्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमातून अक्षय आणि टायगरच्या अ‍ॅक्शनचा तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. या सिनेमासाठी अभिनेत्यांनी तगडी रक्कम घेतली आहे. सध्या सोशल मीडियावर 'बड़े मियाँ छोटे मियाँ' सिनेमासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा सुरू आहे. 

जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'बड़े मियाँ छोटे मियाँ'चे बजेट 350 कोटी रुपये आहे, ज्यामुळे तो सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ८० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तर टायगरने ४० ते ४५ कोटी रुपयांचं मानधन घेतलंय. पृथ्वीराज सुकुमारने या चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेतले आहेत. 

रोनित रॉय यांनी या चित्रपटात एक आर्मी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारलीये. त्यांनी या चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेतले. सोनाक्षी सिन्हाने 'बड़े मियाँ छोटे मियाँ' साठी दोन कोटी रुपयांचं मानधन घेतलंय. यासोबतच मानुषी छिल्लरने या चित्रपटासाठी २ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. अलायाने सुद्धा रोनित रॉय प्रमाणेच 'बड़े मियाँ छोटे मियाँ' साठी एक कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 

'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमात अक्षय कुमारची टायगर श्रॉफसोबत त्याची केमिस्ट्री चांगली दिसतेय. यासोबतच मानुषी छिल्लरने शानदार काम केलं आहे. पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, रोनित रॉय या सर्वांनीच आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडमानुषी छिल्लरसोनाक्षी सिन्हारोनित रॉयअलाया फर्निचरवाला