Join us

Video: 'बागबान'फेम अभिनेत्यावर आली बेरोजगारीची वेळ; हात जोडून मागतोय दारोदारी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 1:55 PM

Nassir khan: 'बागबान'फेम नासिर खानची कामासाठी वणवण; बिग बींचा ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट व्हायरल

काही सिनेमा असे असतात जे प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडतात. त्यामुळे हे सिनेमा पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यात आपसुकच पाणी येतं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे बागबाग. बॉलिवूडमध्ये हा सिनेमा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सलमान खान असे अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात झळकले होते. परंतु, याच सिनेमातील एका अभिनेत्यावर आता काम मागायची वेळ आली आहे. काम मिळत नसल्यामुळे या अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत काम मागितलं आहे. सोबतच आता मी थकलो आहे असंही तो म्हणाला आहे.

'बागबान' या गाजलेल्या सिनेमातील अभिनेता नासिर खान (Nassir Khan) सगळ्यांच्याच लक्षात असेल. या सिनेमात नासिरने अमिताभ बच्चन यांच्या धाकट्या लेकाची  करण मल्होत्राची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने बऱ्यापैकी चांगलं काम केलं. मात्र, त्यानंतर तो फारसा कुठे झळकला नाही. परंतु, आता हातात काम नसल्यामुळे त्याने व्हिडीओ शेअर करत दिग्दर्शक, निर्मात्यांकडे काम मागितलं आहे.

नासिरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याचं वय, उंची,नाव अशी सगळी पर्सनल माहिती दिली आहे. परंतु, मी खूप काम केलंय त्यामुळे आता ऑडिशन देऊ शकत नाही असंही त्याने आवर्जुन सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाला नासिर?

"माझं नाव नासिर खान आहे. माझी उंची ५ फूट ९ इंच आहे. वय ५५ वर्ष. सगळ्या कास्टिंग डायरेक्टर, त्यांचे असिस्टंट या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, मी अनेक जाहिराती, मालिका, वेब सीरिज आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तुम्ही नक्कीच मला पाहिलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यात ती पात्रता आहे आणि मी एक चांगला अभिनेता आहे तर प्लीज मला कॉल किंवा मेसेज करा. मला तुमच्या सगळ्यांसोबत काम करायला नक्की आवडेल,'' असं नासिर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "पण कृपया आता माझ्यात ऑडिशन देण्याची ताकद राहिलेली नाही आणि माझ्यात ती हिंमत सुद्धा नाही. मी आता ऑडिशन देऊ शकत नाही आणि मी एखाद्या भूमिकेसाठी योग्य आहे हे दाखवण्यासाठी मला ऑडिशन देण्याची गरज सुद्धा नाही. तुम्हाला वाटत असेल मी काम करण्याच्या लायक आहे. तर प्लीज मला कॉल करा. मी काम करायला तयार आहे. पण, ऑडिशन देण्यासाठी (नाही)..."

दरम्यान, नासिर २००८ ते २०१५ या काळात बेरोजगार होता.२०२२ मध्ये त्याने ईटाइम्सला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या बेरोजगारीच्या दिवसांमधील आठवणी शेअर केल्या. २०१५ पर्यंत हातात काम नसल्यामुळे तो अमेरिकेत एका कंपनी काम करु लागला होता. परंतु, ही कंपनी सुद्धा बंद झाली. त्यानंतर तो पुन्हा भारतात परतला. त्यानंतर २०२२ मध्ये त्याला एक मालिका मिळाली. परंतु, आता पुन्हा त्याच्या हातात काम नसल्यामुळे तो काम मागताना दिसत आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअमिताभ बच्चनहेमा मालिनी