Join us

‘बाहुबली 2’ : 300 सिनेमागृहात रिलिज होणार ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 12:18 PM

तामिळ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ हा सिनेमा त्या सिनेमांपैकी एक ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. हा ...

तामिळ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ हा सिनेमा त्या सिनेमांपैकी एक ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा यूए सर्टिफिकेटसह येत्या २८ एप्रिल रोजी रिलिज होणार असला तरी, त्याच्या ट्रेलरच्या प्रतीक्षेने प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी ट्रेलरचे ग्रॅण्ड लॉन्चिंग करण्याचे ठरविले असून, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सुमारे ३०० सिनेमागृहांमध्ये ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रिलिज केले जाणारे हे ट्रेलर २ मिनिट २ सेकंदाचे असेल. सिनेमाचे निर्माता शोबू यार्लागदा यांनी म्हटले की, ट्रेलरच्या रिलिजविषयी आम्ही थोडे घाबरलेले आहोत. बुधवारी सिनेमाला मिळालेल्या सर्टिफिकेटचा एक फोटो ट्विटरवर शेअर करताना शोबू यांनी लिहिले की, ‘बस्स.. फक्त एक दिवस! हे सांगणे गरजेचे आहे कारण आम्ही थोडेसे घाबरलेलो आहोत. अपेक्षा करतो की, तुम्ही यास पसंत कराल!दरम्यान ‘बाहुबली २’ चे ट्रेलर सकाळी ९ वाजेपासून सिनेमागृहात दाखविले जाणार आहे. त्याचबरोबर आॅनलाइनही रिलिज केले जाणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले की, सिनेमागृहात ट्रेलर दाखविल्यानंतर सायंकाळी पाच किंवा सहा वाजता आॅनलाइन रिलिज केले जाणार आहे. या सिनेमाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलिज केला होता. हा सिनेमा २०१५ मध्ये आलेला ‘बाहुबली : द बिगिनिंग’चा दुसरा आणि शेवटचा भाग आहे. याविषयी राजामौली यांनी सांगितले होते की, पहिला भाग ही केवळ सुरुवात होती. मुख्य कथा दुसºया भागात आहे. पहिला सिनेमाने जवळपास ६५० कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. तसेच बेस्ट सिनेमाचा नॅशनल अवॉर्डही पटकाविला होता. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सर्वाधिक यशस्वी सिनेमा म्हणून बाहुबलीच्या नावे रेकॉर्ड आहे. ALSO READ : ‘बाहुबली2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा शिगेला! पाहायला मिळू शकतात, या गोष्टी!!‘बाहुबली : द कन्क्लूजन’ मध्ये पहिल्या भागातीलच बºयाचशा पात्रांना दाखविण्यात येणार आहे. सिनेमात राणा दग्गुबाती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहे. तर प्रभास हा बाहुबलीच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात या सिनेमाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. दुसºया भागात प्रेक्षकांना त्यांची उत्तरे मिळणार असल्याने या सिनेमाविषयी प्रचंड आतुरता निर्माण झाली आहे.