‘बाहुबली’ची आई शिवगामीचे वधारले भाव! साऊथच्या बड्या बड्या अभिनेत्रींनाही टाकले मागे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 10:03 AM
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने ...
‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ या चित्रपटांतील ‘बाहुबली’ नंतर सर्वाधिक यादगार भूमिका कुठली असेल तर ती राजमाला शिवगामी देवीची. होय, अभिनेता प्रभासने या चित्रपटात बाहुबली साकारला तर अभिनेत्री रम्या कृष्णन हिने राजमाता शिवगामी देवीचे पात्र जिवंत केले. शिवगामी देवीच्या रूपात रम्याशिवाय इतर कुणाची कल्पनाही आता आपण करू शकणार नाहीत, इतका जीव तिने या भूमिकेत ओतला. या भूमिकेने रम्याला बरीच लोकप्रियता दिली. ‘बाहुबली’ चित्रपटात अमरेन्द्र बाहुबली जितका भाव खावून गेलास. तितकाच भााव खावून गेली ती बाहुबलीची आई शिवगामी. याच शिवगामीबद्दल अर्थात रम्याबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, ‘बाहुबली’नंतर ‘शिवगामी’ अर्थात रम्याने आपली फी वाढवली आहे. सूत्रांचे मानाल तर रम्याने एका दिवसाच्या शूटची फी ६ लाख रूपये केली आहे. सध्या राम्या तेलगू चित्रपट ‘सैलजा रेड्डी’चे शूटींग करतेय. यासाठी ती एक दिवसाला ६ लाख रूपये घेत आहे. या चित्रपटाचे शूटींग २५ दिवस चालणार आहे. म्हणजे, या चित्रपटासाठी राम्याला दीड कोटी रूपये मिळणार आहेत.एका मुलाखतीत राम्या ‘बाहुबली’बद्दल बोलली होती. जेव्हा कटप्पा बाहुबलीच्या मृत्यूनंतरचे सत्य शिवगामीला सांगतो, तो सीन पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, असे तिने सांगितले होते. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’ हे दोन्ही चित्रपट रिलीज झाले आहेत आणि सुपरडुपर हिट राहिले आहेत.ALSO READ : ‘बाहुबली2’च्या शिवगामीने ‘या’ बॉलिवूड स्टार्ससोबत केलाय रोमान्स!‘बाहुबली’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या रम्याने आतापर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात रम्या झळकलेली आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटात रम्या दिसली होती. या चित्रपटात तिने एक डान्सरचा कॅमिओ केला होता. १९९३ मध्ये आलेल्या संजय दत्तच्या ‘खलनायक’मध्येही तिने भूमिका साकारली होती.अर्थात ‘चाहत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटांनी ती विशेष करून ओळखली गेली होती.