Join us

​‘बाहुबली’ प्रभास खरचं करतोय का हॉलिवूड डेब्यू? उत्तर हवे असेल तर वाचा बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 8:08 AM

‘बाहुबली’ प्रभास हॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा सध्या जोरात आहे. साहजिकचं ही चर्चा खरी असेल तर हा प्रभासच्या करिअरचा ...

‘बाहुबली’ प्रभास हॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा सध्या जोरात आहे. साहजिकचं ही चर्चा खरी असेल तर हा प्रभासच्या करिअरचा टर्निंग पॉर्इंट म्हणता येईल. पण आमचे मानाल तर सत्य काही वेगळचे आहे. होय, यामागे एक खास कारण आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभासचा हॉलिवूडला जाण्याचा कुठलाही प्लान नाही. प्रभासला हॉलिवूडमध्ये पाहू इच्छिणा-या चाहत्यांच्या अपेक्षा तूर्तास तरी पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. कारण प्रभास हॉलिवूडला जाणार, हा निव्वळ एक अंदाज आहे. होय, ‘ब्लॅक पँथर’चा अभिनेता विन्स्टन ड्यूक याने ‘बाहुबली’ प्रभासची प्रशंसा केली आणि इतकेच निमित्त झाले. इथूनचं प्रभासच्या हॉलिवूड डेब्यूच्या बातम्या यायला लागल्या. विन्स्टनने सोशल मीडियावर ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’चे फोटो शेअर करत, प्रभासची तोंड भरून स्तूती केली. प्रभास एक राजा आहे. मी त्याच्या दीर्घआयुष्याची कामना करतो. प्रभास त्या निवडक अभिनेत्यांपैकी एक आहे, जे मला आवडतात, असे विन्स्टनने लिहिले. विन्स्टनने प्रभासच्या केलेल्या या प्रशंसेचा वेगळाच अर्थ काढला गेला. या प्रशंसेनंतर  प्रभास हॉलिवूडला जाणार, असे मानले जावू लागले आणि पुढे प्रभासच्या हॉलिवूड डेब्यूवर वेगवेगळ्या बातम्या येत राहिल्या. ‘ब्लॅक पँथर’च्या पुढील सीरिजमध्ये प्रभास विन्स्टनसोबत दिसणार, इथपर्यंत बातम्या आल्यात. पण असे काहीही नाहीये. तूर्तास प्रभास त्याच्या ‘साहो’ या चित्रपटावर लक्ष केंद्रीत करतोय. या चित्रपटाशिवाय प्रभासचा दुसरा कुठलाही प्लान नाही.ALSO READ : ​चिरंजीवीची पुतणी निहारिका होणार का 'बाहुबली' प्रभासची वधू?‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’मध्ये प्रभास तुफान अ‍ॅक्शन करताना दिसला होता. ‘साहो’मध्येही तो पुन्हा एकदा असाच काहीसा कारनामा करताना दिसणार आहे.  या चित्रपटात तो बाहुबली सीरिजपेक्षाही तुफान अ‍ॅक्शन करताना दिसणार असल्याचे कळतेय.विशेष म्हणजे या अ‍ॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.   प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर.  नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.