Join us

‘बाहुबली’ प्रभासच्या स्टारडमची सलमान खानने घेतली धास्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 2:38 PM

प्रभास स्टरर ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड एका महिन्याच्या आतच पायदळी तुडविले आहेत. तब्बल १६०० कोटी रुपयांची कमाई करणाºया ...

प्रभास स्टरर ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड एका महिन्याच्या आतच पायदळी तुडविले आहेत. तब्बल १६०० कोटी रुपयांची कमाई करणाºया या चित्रपटाचा झंझावत अजूनही सुरूच असून, हा चित्रपट दोन हजार कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास एक हजार कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमधील तिन्ही खान ‘बाहुबली’सारखा चित्रपट बनविण्याची योजना आखत नसतील तरच नवल. त्यातही सलमान खानने तर ‘बाहुबली’ प्रभासच्या स्टारडमची जणू काही धास्तीच घेतली आहे. याच कारणामुळे त्याने अद्यापपर्यंत हा चित्रपट बघितला नसल्याचेही समोर येत आहे. होय, तुम्ही जे वाचले ते अगदी खरं आहे. कारण हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द सलमाननेच सांगितले आहे. त्याच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये मीडियाशी बोलताना त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. सलमानने म्हटले की, मला अद्यापपर्यंत ‘बाहुबली-२’सारखा भव्य चित्रपट बघण्याचे सौभाग्य लाभले नाही. ऐवढेच नाही तर त्याने हेही स्पष्ट केले की, चित्रपटाचे यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे. वास्तविक प्रत्येक चित्रपट हा त्याचे नशीब घेऊन येत असतो’ आता सलमानचे हे वाक्य अनेकांना खटकणारे वाटले. ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंट कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना सलमानने ‘बाहुबली-२’विषयी प्रतिक्रिया दिली. कारण आपण असे समजू शकू की, ‘बाहुबली-२’ बघण्यासाठी सलमानकडे पुरेसा वेळ नसेल. मात्र ‘प्रत्येक चित्रपट नशीब घेऊन येत असतो’ असे म्हणून सलमानने चित्रपटाच्या भव्यतेवरच शंका उपस्थित केली. आता सलमान असे का बोलला? त्याला ‘बाहुबली’च्या यशाची किंवा प्रभासच्या स्टारडमची भीती वाटत आहे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट करून याविषयी चर्चा घडवून आणली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘बहु’-‘त’-‘बली’यां चढेंगी फिल्मोंज की, या चित्रपटाच्या बिझनेसची बरोबरी करताना. हा एक भारतीय उत्सव आहे. मला आनंद होत आहे की, मी या चित्रपटाच्या बिझनेसचा भाग बनू शकलो.’ या ट्विटमधून ऋषी यांनी बॉलिवूडकडे बोट दाखविताना साउथ चित्रपटांमधून काही तरी शिकायला हवे असा जणू काही इशाराच दिला होता. काही दिवसांपूर्वीच ‘खतरो के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या लॉन्चिंगप्रसंगी जेव्हा दिग्दर्शक रोहित शेट्टी याला विचारण्यात आले होते, तेव्हा त्याने ‘बाहुबली-२’ने एक हजार कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्याने बॉलिवूड चित्रपटांना आता सतर्क व्हावे लागणार आहे. यावेळी रोहितने असेही म्हटले होते की, ‘मी बाहुबली आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीचे कौतुक करतो. बॉलिवूडला या चित्रपटापासून नक्कीच शिकायला हवे. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमीच एखाद्या मॉल किंवा शोमध्ये सहभागी व्हायला हवे असे आवश्यक नाही, हे या चित्रपटाने दाखवून दिले आहे. कुठलेही प्रमोशन न करता चित्रपटाने मिळवलेले यश डोळे दिपवून टाकणारे असल्याचेही त्याने म्हटले होते. असो, सलमानविषयी बोलायचे झाल्यास त्याने ‘बाहुबली-२’चे सरळ शब्दात कौतुक केले नाही. मात्र त्याला एका गोष्टीची नक्कीच जाणीव झाली असेल की, आता त्याचा सामना बाहुबली प्रभासशी होणार आहे. प्रभासच्या स्टारडमची सलमानला भीती वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.