प्रियंका चोप्रा (priyanka chopra) ही जगात नाव गाजवणारी अभिनेत्री. बॉलिवूडमधून अभिनयाची सुरुवात करणारी प्रियंका पुढे आंतरराष्ट्रीय गायिका बनली. इतकंच नव्हे हॉलिवूडच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये तिने काम केलं. आता प्रियंका चोप्रा अनेक वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय सिनेमात झळकणार आहे. 'बाहुबली' फेम राजामौलींच्या आगामी सिनेमात प्रियंका दिसणार आहे. त्यानिमित्त प्रियंका भारतात आली असता तिला एक खास अनुभव आला.प्रियंकाला आला फळविक्रेत्या महिलेचा खास अनुभवप्रियंकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती सांगते की, "मला आज एका घटनेने खूप प्रेरणा मिळाली. मुंबईला जाण्यासाठी विशाखापट्टणम एअरपोर्टला मी जात होते. तेव्हा मी एका महिलेला पेरू विकताना बघितले. मला कच्चे पेरू खूप आवडतात त्यामुळे मी गाडी थांबवून त्या पेरूची किंमत त्या महिलेला विचारली. तिने १५० रुपये सांगितलं. मी २०० रुपये तिला दिले."
"१५० च्या पेरूसाठी मी २०० रुपये देताच त्या महिलेने..."; मायदेशी येताच प्रियंका चोप्राने सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:24 IST