Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुन्नी मोठी झाली! बजरंगी भाईजानच्या हर्षालीला ओळखलंत का? Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 12:37 IST

'बजरंगी भाईजान' फेम हर्षाली मल्होत्रा नुकतीच कॅमेऱ्यात कैद झाली.

2015 साली आलेला 'बजरंगी भाईजान' (Bajrangi Bhaijaan) सिनेमा आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. उत्तम पटकथा आणि अप्रतिम अभिनयाने सिनेमा सुपरहिट ठरला होता. कबीर खानने दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान, करिना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका होती. सिनेमात 'मुन्नी'चं पात्र साकारणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) विशेष आकर्षण होती. आता हीच मुन्नी मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

'बजरंगी भाईजान' फेम हर्षाली मल्होत्रा नुकतीच कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबईत एका ठिकाणी ती आलेली असता पापाराझींनी तिच्याभोवती गर्दी केली. हर्षालीनेही हसतहसतच त्यांना पोज दिली. आजही तिची स्माईल अगदी  ८ वर्षांपूर्वी होती तशीच आहे. हर्षाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. ती उत्तम डान्सरही आहे. लवकरच ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसेल अशी शक्यता आहे. दरम्यान सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांनी हर्षालीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर निळ्या रंगाची लेगिंग्स घातली आहे.

हर्षालीचे इन्स्टाग्रामवर 10 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या ती नृत्याचे धडे गिरवत असून त्याचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडतात. आता ही मोठी मुन्नी पुन्हा पडद्यावर कधी दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :हर्षाली मल्होत्रासलमान खानबॉलिवूडसोशल मीडिया