Join us

बॅन्जो सिनेमा माझ्यासाठी महत्वपुर्ण -रितेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2016 11:13 AM

 प्रियांका लोंढे          लय भारी अभिनेता रितेश देशमुखने बॅन्जो चित्रपट आणि लोकमतच्या तीचा गणपतीच्या निमित्ताने ...

 प्रियांका लोंढे
          लय भारी अभिनेता रितेश देशमुखने बॅन्जो चित्रपट आणि लोकमतच्या तीचा गणपतीच्या निमित्ताने लोकमत आॅफिसला भेट दिली. यावेळी रितेशने बॅन्जो चित्रपटातील त्याची भूमिका, रॉकस्टार लूक आणि बॉलिवूड बॉक्स आॅफिसचे गणित या सर्वच विषयांवर मनमोकळ््या गप्पा मारल्या. रितेश देशमुखशी  साधलेला हा दिलखुलास संवाद खास तुमच्यासाठी 
               
 बॅन्जो चित्रपटासाठी तू लुक चेंज केलास, या चित्रपटासाठी तु खुपच उत्सुक दिसतोयस याचे कारण काय?
 : बॅन्जो हा सिनेमा माझ्यासाठी महत्वपुर्ण आहे. असा चित्रपट मिळाल्यावर भूमिकेसाठी अभ्यास करावाच लागतो. शिवाय आपण जे करतो ते प्रेक्षकांना आवडायलाही पाहिजे असते. मी या चित्रपटासाठी जेव्हा केस वाढवत होतो तेव्हा माझी हाऊसफु ल्लची शुटिंग सुरू होती. त्या चित्रपटात माझे केस फारच बारिक होते. पण या गोष्टी मी मॅनेज केल्या आणि हा माझा  फ्रेश लूक बॅन्जोच्या निमित्ताने आज सर्वांच्याच समोर आहे. 
 
चित्रपटातील तुझी  एन्ट्री फारच धमाकेदार आहे, त्याबद्दल काय सांगशील ?
: चित्रपट ऐकताना आपण कथा ऐकतो, त्यात तीन मुद्दे महत्वाचे असतात. शेवट, मध्यांतर आणि हिरोची एंट्री. या चित्रपटात माझी एंट्री गटारातून आहे. मला वाटल खरतर शूटिंगसाठी गटार तयार करण्यात येईल.  पण रवी जाधवला रिअ‍ॅलिझमचा आजार आहे की काय माहित नाही, त्यांनी खरी गटारे शोधरी आणि त्यातून माझी एंट्री घेतली. पण अशा एंट्री प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात राहतात.
           
 बॅन्जोच्या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी केली होतीस ?
: लहानपणी माझ्याकडे बॅन्जो होता.  माझे काही मित्रही कार्यक्रमांमध्ये  बॅन्जो वाजवायचे. रवी जाधवने मला बॅन्जो करसा वाजवतात त्याचे काही व्हीडीओ दाखवले. पण या रॉकस्टारची गंमंत जरा वेगळीच आहे.  दुसरे जसे बॅन्जो वाजवतात तसे हा रॉकस्टार वाजवत नाही. खरतर बॅन्जो बसून वाजवतात. परंतू हा रॉकस्टार असल्याने आम्ही उभे राहून वाजविण्याचे ठरविले. तर या सर्वच  गोष्टींची मी तयारी केली होती.
 
कंटेन्ट आणि कॉमर्सचा यामध्ये तुला काय महत्वाचे वाटते ?
: माझे असे म्हमणे आहे की, तुमच्याकडे आशय चांगला आसेल तर कॉमर्स तुमच्या मागे येईल. कॉमर्स साठी कंटेन्ट बनविणार असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कारण तुमची दिशा भरकटलेली असेल.  कंटेन्ट चांगला असेल तर तुमचा पेपर देखील चालतो.  कंटेन्ट नसताना जर खप वाढविण्यासाठी  पेपर छापत असाल तर त्यात काही तथ्य नाही हे आपल्या सगळ््यांनाच माहितीय.  
 
तू महाराष्ट्रीयन आहेस आणि एखादी मराठमोळी भूमिका करताना तुला कसे वाटते ?
:  लय भारी मध्ये मी जी व्यक्तिरेखा साकारली होती ती जरा वेगळी होती. आता बॅन्जो मध्ये करत असलेल्या भूमिकेला मुंबईच्या मराठी भाषेचा तडका आहे.   मुंबईची मराठी वेगळी आहे. तीला आपण मुंबईया भाषा म्हणतो. आणि ही भूमिका साकारताना  शब्द कसे वापरायचे, बोलायची लकब या सर्व गोष्टी मला रविने शिकविल्या. त्यामुळे हे कॅरेक्टर करताना फारच मजा आली. 
                        
 बॉक्स आॅफिसवर चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत, त्याबद्दल तु काय सांगशील ?
: बॉलिवूडमध्ये आपण पाहिले तर शाहरूख, सलमान, आमीर यांचे चित्रपट २००, ३०० करोडचे बिझनेस करतात. पण यात देखील एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. व्यावसायिक चित्रपटाचा जर विचार केला तर, जर तुमच्या चित्रपटाचे बजेट ५० कोटी असेल आणि तुम्ही १०० कोटी कमाई केली तर तो चित्रपट आपण यशस्वी झाला असे म्हणू शकतो. परंतू चित्रपटाचे बजेट १५० कोटी आणि कमाई १०० कोटी झाली तर तो फायद्यात गेला का हे देखील पाहावे लागते.
 
  थँक गॉड बाप्पा गाणे चांगलेच गाजत आहे, हे गाणे करतानाचा तुझा अनूभव कसा होता ?
 : थँक गॉड बाप्पाचा जन्म बॅन्जोच्या सेटवरच झाला. बॅन्जोचे संवाद लेखक कपिल सावंत यांनी चार सहा ओळी लिहिल्या आणि मला सांगितले की यावर काहीतरी करायचा माझा विचार आहे. आणि आम्हाला वाटल खरच हे गाणे  प्रेक्षकांपर्यंत पोहचायला पाहिजेत.  या गाण्याला लोकांचा प्रतिसाद चांगला आला. सोप्या पद्धतीने यामध्ये मते मांडली आहेत. यामध्ये असे सांगितले आहे की दोष कोणाला नाही, दोष स्वत:ला द्यायचा असतो, थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो.