Happy birthday priyanka: बरेली ते न्यूयॉर्क ! असा राहिला प्रियांका चोप्राचा यशस्वी प्रवास!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 8:27 AM
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा आज (१८ जुलै) वाढदिवस. प्रियांकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा हिचा आज (१८ जुलै) वाढदिवस. प्रियांकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. रिअल लाईफमध्ये एक यशस्वी अभिनेत्री, यशस्वी गायिका, यशस्वी निर्माती अशा वेगवेगळ्या भूमिकेत वावरणा-या प्रियांकाबद्दल ब-याच इंटरेस्टिंग गोष्टी कदाचितच तुम्हाला माहित असतील. पिग्गीच्या याच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रियांकाचा जन्म १८ जुलै १९८२मध्ये झारखंडच्या जमशेदपूर येथे झाला. तिचे वडिल पंजाबच्या अंबालाचे होते तर आई झारखंडची आहे. पिग्गीचे आई-वडिल दोघेही भारतीय लष्करात डॉक्टर होते.१३ वर्षांची असतांनापासून प्रियांका अमेरिकेत आपल्या काकूसोबत राहिली. बोस्टनच्या शाळेत तिने प्रवेश घेतला. पण शाळेत तिला वंशभेदाला सामोरे जावे लागले. इथला प्रियांकाचा अनुभव बराच वाईट होता. या अनुभवाबद्दल प्रियांका सांगते, ‘वयाच्या केवळ तेराव्या वर्षी यूएसला जाणे हा फार मोठा कल्चरल शॉक होता. मी कधीही कॅफेटेररियामध्ये जात नव्हते. कारण रांगेत कसे उभे राहावे, पैसे कसे भरावे, जेवण कसे करावे हे मला ठाऊक नव्हते. माझ्यात आत्मविश्वास नसल्यामुळे मी वेंडिंग मशीनमधून चिप्स खरेदी करायचे आणि टॉयलेटमध्ये बसून ते खात होते. बोस्टन शहरात तीन वर्षे मी अशीच काढली. बोस्टनमधून परतले तेव्हा शॉर्ट ड्रेस घालून आले. विमातनळावर माझा तो अवतार पाहून डॅड चांगलेच संतापले. यानंतर डॅडीने माझे सगळे जीन्स आणि शॉर्ट्स परत घेत मला बारा जोडी सलवार सूट विकत घेऊन दिलेत.प्रियांका परदेशातून परतली, तेव्हा तिचे नातेवाईक तिला सावळी म्हणून चिडवायचे. यामुळे प्रियांका आत्मविश्वास गमावून बसली. खरे तर प्रियांकाला इंजिनिअर बनायचे होते. पण प्रियांकाच्या आईने एक निर्णय घेतला अन् त्या निर्णयाने प्रियांकाचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. युनिव्हर्सिटीत पुढचे शिक्षण घेण्यासाठी प्रियांकाने जे पासपोर्ट साईज फोटो काढून घेतले होते, त्यापैकी काही फोटो प्रियांकाच्या आईने कुणालाही न विचारता मिस इंडिया स्पधेर्साठी पाठवून दिले. या स्पर्धेसाठी प्रियांकाची निवडही झाली. या स्पर्धेत प्रियांका दुसरी रनरअप ठरली. मग मिस वर्ल्डचा ताज प्रियांकाने आपल्या नावावर केला. पुढे ती बॉलिवूडमध्ये आली आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. सन २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिजहन’मधून अभिनयाची सुरुवात केली. २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळवाणाºया प्रियांकाने अभिनयाच्या आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत हॉलिवूडपर्यंत मजल मारली. २००४ मध्ये ‘ऐतराज’मधील निगेटीव्ह रोलने प्रियांकाला खरी ओळख दिली. ‘डॉन’,‘कृष’ या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील झाली.प्रियांका चोप्राचे नाव अनेकांशी जोडले गेले. असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा, शाहरूख खान व शाहिद कपूर आदींसोबत तिच्या रिलेशनशिपच्या वावड्या उठल्या. पण रिलेशनशिपऐवजी प्रियांकाने करिअरला महत्त्व दिले आणि सर्वांना मागे सोडत ती यशाच्या शिखरावर पोहोचली.
हॉलिवूडमध्ये प्रियांकाने अशी काही एन्ट्री घेतली की, सर्वांनाच तिची दखल घ्यावी लागली. अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’मधून तिचा हॉलिवूड डेब्यू झाला. या शोसाठी प्रियांकाने दोनदा पिपल्स चॉईस अवार्ड जिंकला. यानंतर ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटात ती दिसली.सध्या ती ‘इजण्ट इट रोमॅन्टिक’ या हॉलिवूडपटाचे शूटींग करतेय.
यंदाचा वाढदिवस प्रियांका तिचा कथित बॉयफेन्ड निक जोनाससोबत साजरा करतेय. म्हणजेच प्रियांका सध्या प्रेमात आहे. आपण लग्नासाठी तयार असल्याचे कालपरवाच प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले. एकंदर काय तर लवकरच प्रियांका लग्नाच्या बेडीत अडकलेलीही आपल्याला पाहायला मिळणार आहे.