Join us

'बाटला हाऊस'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, १५ ऑगस्टला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 7:34 PM

जॉन अब्राहम अभिनीत 'बाटला हाऊस' चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली जात होती. मात्र दिल्ली हायकोर्टानं या चित्रपटाच्या रिलीजला हिरवा कंदील दाखवला असून हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट बाटला हाऊस प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली जात होती. मात्र दिल्ली हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला असून हा सिनेमा १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

कोर्टाने निर्मात्यांना या चित्रपटातील एका सीनमधील डायलॉगमधील मुजाहिद शब्द म्युट करायला सांगितला आणि सिनेमाच्या सुरूवातीला व शेवटी डिस्क्लेमर टाकण्याचा आदेश दिला आहे. 

१९ सप्टेंबर, २००८ साली जेव्हा दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये दिल्ली पोलिसांनी एक एन्काउंटर केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशात दिल्ली पोलिसांविरोधात आवाज उठविला गेला होता. या एन्काउंटरला काही लोकांनी खोट्टं ठरवलं तर काहींनी मारले गेलेल्या लोकांना दहशतवाद्यांचे विद्यार्थी असल्याचं सांगितलं. हे सत्य व लढाईची कथा दिग्दर्शक निखिल अडवाणीने बाटला हाऊसमध्ये दाखवली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम आहे.

जॉनसोबत या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णा कुमार मोनिशा अडवाणी, मधू भोजवानी, जॉन अब्राहम आणि संदीप लेझेल हे आहेत.

टॅग्स :बाटला हाऊसजॉन अब्राहम