Join us

अभिनेताच नाही तर अंडरवॉटर फोटोग्राफर देखील प्रवीण डबास, बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केलंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 08:00 IST

प्रवीण डबास एक प्रशिक्षित स्कूबा डायव्हर आणि अंडरवॉटर फोटोग्राफर देखील आहे हे फार कमी लोकांना माहित असेल.

बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबास आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रवीण डबासने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. प्रवीणचा जन्म 12 जुलै 1974 रोजी दिल्लीत झाला आणि अभिनेता बनण्याची इच्छा त्याला मुंबईत घेऊन आली.

प्रवीण डबासने 1999 मध्ये 'दिल्लगी' चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. सनी देओल आणि बॉबी देओलच्या या चित्रपटातून प्रवीणला विशेष ओळख मिळवता आली नाही. याशिवाय प्रवीण 'तपिश', 'खोसला का घोसला', 'सिर्फ', 'जल परी', 'रागिनी एमएमएस 2' मध्ये दिसला होता.

 'मैने गांधी को नही मारा' आणि 'खोसला का घोसला' हे त्यांच्या फिल्मी कारकिर्दीतील हिट चित्रपट होते. अभिनय क्षेत्रात यश न मिळाल्याने प्रवीण दबसने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. 'सही धांधे गलात बंदे' हा त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट होता, या चित्रपटात प्रवीणनेही काम केले होते.

प्रवीण डबासने अभिनय, मॉडेलिंग आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपले हात आजमावले आहेत परंतु तो एक प्रशिक्षित स्कूबा डायव्हर आणि अंडरवॉटर फोटोग्राफर देखील आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. प्रवीण डबास यांनी 2008 मध्ये ‘मोहब्बतें’ गर्ल प्रीती झांगियानीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि चित्रपटांपासून दूर गेली.  दोघांना जयवीर आणि देव ही दोन मुलं आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटी