बी- टाऊनमध्ये 'धूम 4' ला घेऊन रोज नवी नवी चर्चा ऐकायला मिळते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार 'धूम 4'मधून अभिषेक बच्चनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता यात रणवीर सिंग-सलमान खानमध्ये टक्कर होताना दिसणार आहे. मात्र यशराज बॅनरकडून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. ताज्या माहितीनुसार यशराज फिल्मसला धूमच्या चौथ्या सिरीजमध्ये सलमान आणि रणवीरला साईन करण्याची इच्छा आहे. मात्र भाईजान रणवीरसोबत काम करण्यास तयार नाही.
डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार सलमान खानरणवीर सिंगवर नाराज आहे. रणवीर सिंग सलमानचा 'सुल्तान' सिनेमा बघून थिएटरमध्ये नाचायला लागला होता. ही गोष्टीवर सलमानला खटकली होती. त्यामुळे सलमानचा रणवीरवरचा राग आजही गेला नाही आहे. याच कारणामुळे सलमान आजही रणवीर सिंग काम करण्यास तयार नाही आहे. अजूनपर्यंत 'धूम4'ची स्क्रिप्ट ही अजून तयार नाही आहे. विजय कृष्ण आचार्य या सिनेमावर काम करणार आहेत. ते आधी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चे काम पूर्ण करणार आहेत त्यानंतर ते 'धूम 4'च्या स्क्रिप्टवर काम सुरु करणार आहेत. सलमान आणि रणवीरच्या सिनेमांबाबत बोलायचे झाले तर सध्या दोघे ही आपल्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. सलमान भारतच्या शूटिंगमध्ये आहे तो याच 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान 'भारत'मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा यासिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तर रणवीर सिंग सध्या रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये बिझी आहे. यात रणवीरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा 'टेम्पर' या साऊथच्या सिनेमाचा रिमेक आहे.