भामला फाउंडेशनने तयार केले #BeatPlasticPollution अँथम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 6:25 AM
अनेक दशकांपासून प्लॅस्टिकचा वापर आपण आपल्या अवती-भवती होत असताना बघत आलो आहोत.आणि कुठेतरी प्लॅस्टिक शिवाय आपण गत्यंतर नाही असा ...
अनेक दशकांपासून प्लॅस्टिकचा वापर आपण आपल्या अवती-भवती होत असताना बघत आलो आहोत.आणि कुठेतरी प्लॅस्टिक शिवाय आपण गत्यंतर नाही असा समज समाजात असल्याचं आपल्याला सतत जाणवतं. अन्न, औषध तंत्रज्ञान, पॅकेजिंग पद्धती व इतर अनेक कामासाठी आपणांस प्लॅस्टिकचा उपयोग होतो.परंतु ह्याच प्लास्टिकच्या टाकाऊ भागांचा समुद्राच्या पाण्यात होणारा प्रवेश रोखण्यासाठी आपण अक्षम आहोत.समुद्राच्या पाण्यात मिसळल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमुळे वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्वातील पर्यावरणास हानी पोहोचते, त्याचप्रमाणे त्यामुळे पाणी दूषित होते आणि अखेरीस ते दूषित पाणी आपल्या अन्नसाखळीत प्रवेश करते.युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (यूएनओ) नुसार, सुमारे 12 दशलक्ष टन प्लॅस्टिक कचरा पाण्यामध्ये प्रवेश करतो.प्लॅस्टिक कचऱ्यामुळे होणार त्रास हा जगभर पसरलेला आहे.अनेक प्राण्यांचा त्यामुळे जीव गेलेला असून सूक्ष्म प्लॅस्टिक कणांमुळे मातीचे नुकसान झाले आहे ,ज्यामुळे शेती वाढविण्यासाठी वापरली जाणारी माती दूषित झाली आहे.आता मात्र हा उपद्रव थांबण्याची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराच्या भूमिकेत, भामला फाउंडेशनने आपल्या पर्यावरणातील पुढाकारांद्वारे प्लॅस्टिकचा धोका कमी करण्यासाठी ‘Beat Plastic Pollution'हे कॅम्पेन लॉंच केले आहे.या कॅम्पेनची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आली. भामला फाउंडेशनने त्यांचे दिल्लीचे समन्वयक रेणू टंडन आणि मिरज हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयीन निवासस्थानी एक-एक रोपटे लावली. असिफ भामला यांच्या कल्पनेतून अवतरलेले #BeatPlasticPollution अँथम, स्वानंद किरकिरे यांनी लिहिले असून शानने ते संगीतबद्ध केले आहे. तर शान, कनिका कपूर, अरमान मलिक, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, आयुष्मान खुराना, सोनू निगम यांनी ते गायलेले आहे.शामक दावरने त्यावर दिग्दर्शित केलेल्या नृत्यासमवेत आज हे कॅम्पेन बांद्रा येथील ताज लँड्स एन्ड, मुंबई येथे लॉंच करण्यात येईल.सदर कार्यक्रमात अभिनेत्री दीया मिर्झा, शिक्षणतज्ञ अजिंक्य पाटील, गीतकार प्रसून जोशी, नीरज रॉय यांच्यासह अनेक मान्यवरही सहभागी होणार असून राजीव शुक्ला, पूनम महाजन, राजकुमार राव यांच्यासारख्या मान्यवरांना या मोहिमेअंतर्गत गौरविण्यात येणार आहे. भामला फाउंडेशनच्या माध्यमातून असिफ भामला यांनी यापूर्वी संजय दत्तच्या हातात पेपर बॅगची जाहिरात करत व वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली होती.प्लॅस्टिकच्या वापराचा अंत करण्यासाठी भामला फाउंडेशनद्वारे घेतला गेलेला पुढाकार पुढीलप्रमाणे :१) प्लॅस्टिकच्या वापर थांबविण्यासाठी शहरातील आणि आसपास दुकानांतील कापूस किंवा ज्यूट यांसारख्या बायोडिग्रेडेबल कपड्यांमधून बनविलेल्या पिशव्या मार्केट मध्ये आणणे. २) सामान्य जनतेला या उपक्रमासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्यात सहभागी करून घेणे.३) स्थानिक स्वयंसेवकांबरोबर ड्रेनेज स्वच्छता मोहीम सुरू करणे आणि त्यांना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचा-यांना पुरस्कृत करणे.४) पॅकेजिंगमध्ये प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी आणि निसर्गात बायोडिग्रेडेबल असलेल्या लाकूड व पेपरसारख्या विकल्पांचा वापर करण्याकडे ओढा. ५) प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाण्याचा साठा करून ठेवण्याऐवजी काचेच्या बाटलीत ते साठवणे.६) हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक कंटेनर किंवा प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी काचेचे किंवा धातूचे कंटेनर व फॅब्रिकच्या पिशव्यांचा वापर करणे. ७) चहा आणि कॉफी हाऊसमधील प्लॅस्टिक कप्सच्या जागी बायोडिग्रेडेबल कॉफी कपचा वापर करणे.८) खादी पिशव्या तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून लोकांना रोजगार मिळवून देणे.९) ग्रामीण लोकांना रोजगार आणि भारतीय फॅब्रिकला प्रोत्साहन. १०) प्लॅस्टिकला पर्यायी उपाय निर्माण करणे. प्लॅस्टिकचा अंत करण्यासाठी भामला फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी जागतिक पर्यावरण दिनादिवशी केली जाणार असून सध्या त्यासाठी वेगवेगळ्या हालचालींची रणनीती आखण्याचे काम चालू असल्याची माहिती असिफ भामला यांनी दिली.