कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री मालविका शर्मा, मालविका ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मालविकाच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात पोल डान्स आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.
तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.