Join us  

पुरुषी अहंकाराच्या विरोधात बेबो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2016 3:59 PM

करिना कपूरच्या मते, स्त्रियांचे हक्क डावलण्यामागे पुरुषी अहंकार सर्वात मोठे कारण आहे. ती म्हणते, आपल्याकडे पुरुषी अहंकाराविरुद्ध कोणीच बोलत ...

करिना कपूरच्या मते, स्त्रियांचे हक्क डावलण्यामागे पुरुषी अहंकार सर्वात मोठे कारण आहे. ती म्हणते, आपल्याकडे पुरुषी अहंकाराविरुद्ध कोणीच बोलत नाही. महिला सबलीकरणाच्या चर्चेत पुरुषांच्या दमदाटीचा, त्यांच्या वर्चस्वाचा मुद्दा पाहिजे तितक्या जोरकसपणे समोर मांडला जात नाही. माझा आगामी चित्रपट ‘की अँड का’मध्ये या विषयाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.चित्रपटात बेबो करियरला वाहून घेतलेली महत्त्वाक्षी पत्नीच्या भूमिकेत असून अर्जुन कपूर घरसांभाळणाºया नवºयाच्या भूमिकेत आहे. ती म्हणते, विषयाच्या वेगळेपणामुळे मी होकार दिला. अर्धी पटकथा ऐकूनची मी आर. बाल्कींना म्हणाले की, मी हा चित्रपट करतेय.स्टार म्हणून करिनाला काही समस्या येतात का? यावर ती म्हणते, फिल्म कलाकारांचे आयुष्य किती ऐषो-आरामाचे, सुखाचे आणि चिंतामुक्त असेल, त्यांना कशाची कमी भासत नसेल, असा जर तुम्ही विचार करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. आम्हा कलाकारांनासुद्धा दैनंदिन आयुष्यात येणाºया सर्वच समस्यांना सामोरे जावे लागते. आम्हीदेखील इतरांसारखे सामान्य माणसं आहोत.