Begum Jaan : हा सीन शूट करताच विद्या बालन लागायची रडायला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 10:13 AM
विद्या बालन अशी अभिनेत्री आहे, जी प्रत्येक भूमिका स्वत:मध्ये भिनवून पडद्यावर साकारत असते. श्रीजीत मुखर्जी यांच्या ‘बेगमजान’मधील भूमिका विद्याने अशाच प्रकारे साकारली आहे.
विद्या बालन अशी अभिनेत्री आहे, जी प्रत्येक भूमिका स्वत:मध्ये भिनवून पडद्यावर साकारत असते. श्रीजीत मुखर्जी यांच्या ‘बेगमजान’मधील भूमिका विद्याने अशाच प्रकारे साकारली आहे. वास्तविक या चित्रपटातील तिची ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती, परंतु अशातही विद्याने तिच्या भूमिकेला पूर्णत: न्याय दिला आहे. यासाठी तिला तिच्या भूमिकेवर प्रचंड मेहनत घ्यावी लागली. केवळ दहाच दिवसांत तिने रायफल चालविणेही शिकले. परंतु तुम्हाला माहीत आहे काय की, विद्याला कोणता सीन शूट करताना सर्वाधिक मेहनत घ्यावी लागली? हा सीन शूट केल्यानंतर तिच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले होते. चित्रपटात एक खूपच इमोशनल सीन आहे, जो अंगावर शहारे उभे करतो. बेगमला (विद्या) शबनम नावाच्या मुलीला एक नव्हे, दोन नव्हे तर कित्येक वेळा कानाखाली मारावी लागत असते. हा सीन करण्यात विद्याला अजिबात रस नव्हता; मात्र तिच्याकडे दुसरे आॅप्शनही नव्हते. शबनम नावाची ही भूमिका मिष्टीने साकारली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा विद्या मिष्टीला मारत असे, तेव्हा-तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू येत असत. श्रीजीतने कट बोलताच विद्या मिष्टीला मिठी मारत असे. तिच्या कपाळ्याचे चुंबन घेत असे. शूटिंगदम्यान हा प्रसंग बºयाचवेळा बघावयास मिळाला. कारण अशा प्रकारचा सीन संपल्यानंतर विद्या खूपच इमोशनल होत असल्याचे बघावयास मिळाले. चित्रपटातील एक मेकिंग व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता ज्यामध्ये विद्या कित्येकदा मिष्टीला मारताना दिसत आहे. दरम्यान, ‘बेगमजान’ हा चित्रपट ‘राजकिहनी’ या बंगाली चित्रपटावर आधारित आहे. भारत-पाकिस्तानच्या फाळणीदरम्यानची कथा यात दाखविण्यात आली आहे. भारत आणि पाकमध्ये जेव्हा फाळणी होते तेव्हा या दोन देशांच्या सीमेवर असलेल्या एका कोठ्यामुळे अडचण निर्माण होते. हा कोठा बेगमजानचा असतो. कोठा हटवितानाचा संघर्ष यामध्ये दाखविण्यात आला आहे. चित्रपटात नसीरुद्दीन शाह, आशीष विद्यार्थी, चंकी पांडे, इला अरुण, गौहर खान आणि पल्लवी शारदा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज झाला आहे.