पाकिस्तानात रिलीज होणार नाही ‘बेगम जान’, जाणून घ्या त्यामागचे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 4:04 PM
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा आगामी ‘बेगम जान’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. कारण चित्रपटाची एकंदरित कथा बघता प्रेक्षकांना त्याच्या रिलीजची आतुरता लागली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा आगामी ‘बेगम जान’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. कारण चित्रपटाची एकंदरित कथा बघता प्रेक्षकांना त्याच्या रिलीजची आतुरता लागली आहे. मात्र विद्याच्या पाकिस्तानी फॅन्ससाठी एक वाइट बातमी आहे. वृत्तानुसार, विद्याचा ‘बेगम जान’ पाकिस्तानात रिलीज होणार नाही. चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट यांनी पाकिस्तानी सरकारला चिठ्ठी लिहिताना पाकिस्तानात चित्रपट रिलीजची परवानगी मागितली होती. परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानी सरकारकडून त्यास उत्तर आले नसल्याने हा चित्रपट आता पाकिस्तानात रिलीज होणार की नाही, याविषयी साशंकता आहे. भारत आणि पाक फाळणीदरम्यान एका सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘बेगम जान’विषयी महेश भट्ट म्हणतात की, या चित्रपटाचा कुठलाही पॉलिटिकल किंवा डिप्लोमेटिक संबंध नाही. त्यामुळे आम्ही पाकिस्तानी सरकारला चिठ्ठी लिहून रिलीजबाबतची विनंती केली. मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे उत्तर आलेले नाही. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजविषयी साशंकता असली तरी आम्ही आशावादी असल्याचे भट यांनी म्हटले आहे. ‘बेगम जान’ हा चित्रपट १९४७ सालच्या भारत-पाक फाळणीदरम्यान बंगालच्या या कोठ्यात राहणाºया ११ महिलांच्या कथेवर आधारित आहे. ज्याचा अर्धा भाग भारतात तर अर्धा भाग पाकिस्तानात असतो. विद्या बालनने या चित्रपटात त्याच्या कोठ्याच्या मालकीणीची भूमिका साकारली आहे. श्रीजीत मुखर्जी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात विद्यासोबत नसीरुद्दीन शाह, रजत कपूर, पल्लवी शारदा, इला अरुण, आशिष विद्यार्थी, चंकी पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटामुळे सध्या विद्या चर्चेत असून, प्रमोशनसाठी ती जागोजागी फिरत आहे.