Join us

बेगम करीनाच्या त्या ड्रेसवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:52 PM

नुकतंच करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केलेत. यानिमित्ताने करणने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बेबो करीना कपूर खानही सहभागी झाली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. नुकतंच करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केलेत. यानिमित्ताने करणने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बेबो करीना कपूर खानही सहभागी झाली होती. बेबोने यावेळी परिधान केलेल्या ड्रेसने उपस्थितांच्या नजरा आकर्षित केल्या. तिने यावेळी बालमॅन प्लंज नेक ड्रेस परिधान केला होता. यामध्ये गोल्डन बटन लावलेले होते. या ड्रेसची किंमत जवळपास २ लाख रूपये इतकी आहे. या ड्रेसमध्ये करीनाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळालं. करीनाचा हा ड्रेस पाहून तुम्हालाही तो खरेदी करण्याची इच्छा झाली नसेल तरच नवल.

करिनापेक्षाही सध्या जास्त चर्चेत आहे तो म्हणजे लाडका लेक छोटे नवाब तैमूर अली खान. स्टार किड्सपैकी सगळ्यात चर्चित चेहरा. तैमूरच्या बाल लीला अशा काही आहेत की तो नेहमीच चर्चेत असतो. तैमूरच्या या लोकप्रियतेमुळे त्याच्या फॅन्सच्या नजरेतून एक गोष्ट चुकली नसावी. तैमूर कायमच एका व्यक्तीसोबत सगळ्यात जास्त पाहायला मिळाला आहे. ही व्यक्ती कायमच छोटे नवाबसह त्याची सावली बनून असते. ही व्यक्ती म्हणजे तैमूरची देखभाल करणारी आया. तैमूरच्या याच खास आयाबद्दल एक अशी माहिती तुम्हाला सांगणार आहोत जी जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तैमूरच्या आयाचा महिन्याचा पगार तब्बल दीड लाख रुपये इतका आहे. कधी कधी महिन्याच्या पगाराची ही रक्कम पावणे दोन लाखांच्या घरात पोहचते. तैमूरला सांभाळताना जर ओव्हरटाईम झाला तर महिन्याच्या पगाराचा हा आकडा वाढत वाढत जवळपास २ लाखांच्या घरात पोहचतो. शिवाय तिला एक कारसुद्धा देण्यात आली आहे. याच कारमधून ती लहानग्या तैमूरला वांद्रे आणि परिसराचा फेरफटका मारुन आणते.

टॅग्स :करिना कपूरतैमुर