हे तर भन्नाटच एरिअल योगा करणा-या अभिनेत्रीने वेधले लक्ष, तुम्ही तरी ओळखले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 07:08 PM2021-02-12T19:08:35+5:302021-02-12T19:13:29+5:30
तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.यापूर्वीही तिच्या वर्कआऊट स्टाइलमुळे ती चर्चेत आली होती.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो, अगदी त्याचप्रमाणे जॅकलिन फर्नांडिसही नित्यनियमाने योगा करत फिट बनत आहे. ग्लॅमरस दिसण्यामागे योगाचे मोठे योगदाना आहे. दिवसेंदिवस फिटनेसफ्रिक अभिनेत्री अशी तिची ओळख बनत चालली आहे. तिच्या इस्टाग्रामवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे वर्कआऊट, योगा करतानाचे अनेक फोटो व्हिडीओ पाहायला मिळतील. जॅकलिन अवघड आणि तेवढीच भन्नाट असणारी योगासनं ती अगदी सहज करतेय.
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.यापूर्वीही तिच्या वर्कआऊट स्टाइलमुळे ती चर्चेत आली होती.
जॅकलिन शी रॉक्स लाइफ नावाचा फिटनेस उपक्रमदेखील सुरू करणार आहे.जॅकलिन बर्याचदा योग आणि बॅले डान्ससह तिच्या फिटनेस रूटीनची जबरदस्त आकर्षक फोटो शेअर करत चाहत्यांनाही प्रेरणा देत असते.
नुकतेच काही तासांपूर्वी जॅकलिनने तिच्या इंस्टा चाहत्यांसाठी एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एरियल योगा करताना दिसत आहे. जॅकलिनचा हा फोटो नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांकडूनही खूप पसंत केला जात आहे.
सिनेमांमध्ये अभिनय करण्याबरोबर इतर गोष्टींमध्येही जॅकलिन अधिक लक्ष देते. आठवडाभर पूर्ण मन लावून काम केल्यानंतर विकेंडला मात्र ती स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवते. या वेळेत ती तिच्या आवडीच्या गोष्टी करताना दिसते. कधी गोल्फ खेळताना दिसते तर कधी घोडेस्वारी करताना दिसते. याशिवाय तिला पोल डान्सचीही खूप आवड आहे. तर अधून मधून पोल डान्स करताना ती दिसते.
वर्कआऊट बरोबर तिच्या खाण्यापिण्याकडेही ती काटेकोर लक्ष देते. जॅकलिन फर्नांडिजला प्राण्यांवर खूप प्रेम आहे. २०१४ मध्ये पेटाद्वारे जॅकलिनने 'द वूमन ऑफ दी इयर' जिंकले होते. ही अभिनेत्री cruelty-free makeup बॉडी शॉपची ब्रँड अॅम्बेसेडर देखील होती.
श्रीलंकन ब्यूटी नेहमीच मांस आणि दुग्ध रहित खाद्यपदार्थांची निवड करते. तिचे म्हणणे आहे की शाकाहारी झाल्याने तिला पूर्वीपेक्षा बरे आणि निरोगी वाटते. प्राणी हक्कांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ठरवले की शाकाहारी भोजन जीवनशैलीसाठी चांगले आहे.