बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जीने त्याची गर्लफ्रेंड आणि गायिका पिया चक्रवर्तीसोबत लग्न केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोधपूर पार्कमधील परमब्रत चॅटर्जीच्या घरी या कपलच्या लग्नाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परमब्रत आणि पियाच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.
मीडिया रिपोर्टनुसार, परमब्रत आणि पिया यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. कोर्टात लग्नाच्यावेळी त्यांचा जवळचा मित्र निर्माता-दिग्दर्शक अरित्रा सेन उपस्थित होता आणि पियाची जवळची मैत्रीण रत्नाबोली रॉय देखील उपस्थित होती. लग्नात दोघांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. असे म्हटले जात आहे की नवविवाहित जोडपे इंडस्ट्रीतील जवळच्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी देण्याचा विचार करत आहे.
परमब्रत हा टॉलिवूडमधील व्यस्त अभिनेता आणि दिग्दर्शक असून त्याने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. पियाचे पहिले लग्न संगीतकार अनुपम रॉयसोबत झाले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला परमब्रत चॅटर्जी आणि पिया चक्रवर्ती गुपचूप लग्न करत असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र, अभिनेत्याने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आणि त्या खोट्या असल्याचे म्हटले होते. परमब्रत एका विदेशी मुलीला डेट करत होते आणि दोघांचं लग्नही ठरलं होते. मात्र, कोविडदरम्यान त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघे वेगळे झाले.