'बालिका बधू' (Balika Badhu) या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी तरुण मजूमदार (Tarun Majumdar) यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, तरुण हे मल्टीप्ल ऑर्गन मॉलफंक्शन एलिमेंटमुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांना१४ जून रोजी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रविवारी अचानकपणे त्यांची प्रकृती ढासळली. परिणामी, डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. मात्र, सोमवारी सकाळी ११.१७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, तरुण मजूमदार यांचं निधन झाल्यामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तरुण यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 'बालिका बधू', 'कुहेली', 'श्रीमान पृथ्वीराज', 'दादर किर्ती' यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले.