Join us

Besharam Rang Pathaan : 'बेशर्म रंग' गाण्यात रंग भरणारी डिझायनर कोण; दीपिकाला दिला आजवरचा सर्वात बोल्ड लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 9:27 AM

पठाण सिनेमातील 'बेशर्म रंग' हे गाणे काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहे. यात दीपिकाचा खूपच बोल्ड अॅंड ब्युटिफुल लुक आहे यात शंका नाही.

Besharam Rang Pathaan :  पठाण सिनेमातील 'बेशर्म रंग' हे गाणे काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहे. गाणे कॉपी आहे असो किंवा गाण्यातील डान्सवर टीका असो हे गाणे चर्चेत तर आहे. मात्र यात दीपिकाचा खूपच बोल्ड अॅंड ब्युटिफुल (Bold and Beutiful) लुक आहे यात शंका नाही. दीपिकाच्या स्टाईलमध्ये रंग भरणारी ती स्टाईलिस्ट कोण आहे माहितीये का. ती आहे शालीन नथानी. (Shaleen Nathani)

शालीन नथानीने डिझाईन केलेत आऊटफिट

देशातील सर्वात प्रसिद्ध स्टायलिस्ट (Stylist) शालीन नथानीने बेशर्म रंग गाण्यातील दीपिका आणि शाहरुखचे आऊटफिट डिझाईन केले आहेत. सेलिब्रिटींना वेगळा लुक देण्यासाठी शालीन ओळखली जाते. असाच खास लुक तिने बेशर्म रंग गाण्यात दीपिका आणि शाहरुखसाठी डिझाईन केला आहे ज्याचे आता कौतुक होतेय. गाणे रिलीज झाल्यानंतर शालीन चांगलीच खुश झालीए आणि तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 

शालीन सांगते, ' सिद्धार्थ आनंदने मला गाण्याविषयी माहिती दिली होती. चित्रपटात बेशर्म गाण्याचे महत्व काय आहे. गाणे चित्रपटाच्या कहाणीसोबत जोडलेले आहे. यामुळेच दीपिका गाण्यात बिंधास्त आणि बोल्ड दिसते. तसेच शाहरुख आणि दीपिकाला याआधी कधीच बघितले नसेल असा लुक करण्यास मला सांगितले होते.

ती पुढे म्हणते, या गाण्यासाठी मला मनापासून काहीतरी वेगळे करायची इच्छा होतीच. दोन्ही स्टार्सचे आऊटफिट वेगळे असावे. ज्या पद्धतीने त्यांनी स्विमसूट घातले आहेत, रंगांचा वापर झाला आहे ते फारच युनिक वाटतं. हे आऊटफिट्स घालून कोणीही बाहेर जाऊ शकते. मी या गाण्याला एक डान्स नंबर नाही तर पार्टी मूड सारखे पाहिले आहे. यामुळेच त्यांना कुल लुक देता आला आहे.

शालीनने बॉलिवुडमधील अनेक सिनेमांमध्ये कलाकारांना स्टाईल केले आहे.  सध्या तिची बॉलिवुडमधील मागणी फारच वाढली आहे. मेकर्स शालीनच्या कामावर फारच खुश असल्याचे दिसते.  शालीनने यापूर्वीही अनेकदा दीपिकासाठी आऊटफिट डिझाईन केले आहेत.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणहिंदीसिनेमा