Join us

चक्रावून टाकतो 'हा' १ तास ३७ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 18:04 IST

सिनेमा जसा-जसा पुढे सरकतो, तशी सिनेमाची कथा आणि पात्रे लोकांच्या मनाशी जोडली जातात.

Horror Masterpiece Movie: चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आहेत, ज्यात मोठा सस्पेंस पाहायला मिळतो.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही सस्पेन्सप्रेमी असाल आणि अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल, तर आता तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ झाला आहे, परंतु आजही हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करतो आहे.  हा चित्रपट ५ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मनोरंजनासोबतच कमाल चित्रीकरण, कथानक आणि कलाकारांचा अभिनय असं सर्वकाही एकाच ठिकाणी पाहण्याची संधी हा चित्रपट तुम्हाला देतो.  नेटफ्लिक्स या ओटीटीवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सिनेमा तुम्हाला इतका गुंतवून ठेवेल की एका मिनिटासाठीही तुम्ही आजूबाजूला जाऊ शकत नाही. या चित्रपटाचं नाव आहे "बुलबुल". या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही मुख्य भुमिकेत आहे. 

 बुलबूल भयपट असूनही, परीकथेच्या अंगानं जात सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो. सिनेमा जसा-जसा पुढे सरकतो, तशी सिनेमाची कथा आणि पात्रे लोकांच्या मनाशी जोडली जातात.  चेटकिणीच्या कल्पनेचा वापर करून स्त्री आणि देवीला जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. समाजात होणाऱ्या सत्यघटनांची ही हादरवणारी कथा असून समाज आणि पुरुषी मानसिकतेवर भाष्य करतो.  हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त ३० कोटी रुपये खर्च झाले होते. करोनामुळे हा चित्रपट मोठ्या स्क्रीनऐवजी OTT Netflix वर प्रदर्शित करण्यात आला होता. 

टॅग्स :तृप्ती डिमरीनेटफ्लिक्ससिनेमा