भाग्यश्री सांगतेय या क्षणामुळे बदलले माझे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:00 PM2018-11-29T20:00:00+5:302018-11-29T20:00:02+5:30
भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. ती अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
अभिनेत्री भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा प्रचंड गाजला. या चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’ नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सुक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्या आणि हिमालय दसानीसोबत ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर तिने हिमालयसोबत काही चित्रपट केले. पण या चित्रपटांना प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. ती अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो भाग्यश्रीच्या लग्नातील असून या फोटोत नारंगी रंगाच्या साडीत ती खूपच छान दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, या एका क्षणाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. या तिच्या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स दिले आहेत.
भाग्यश्रीने तिच्या प्रेमकथेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी आणि हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते. अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही आमच्या नात्याला स्वीकारायला तयार नव्हते. त्यामुळे मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांत हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या केवळ एवढेच जण आमच्या लग्नात हजर होते.