Join us

भाईजान सलमान खानला‘लडकी मिल गयी’, दबंग खानच्या ट्विटमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 7:59 AM

बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी ...

बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. त्याच्या लग्नाचा विषय निघताच गेल्या काही वर्षात कॅटरिना कैफचे नाव निघायचे. मात्र सलमानने त्याचा वारंवार इन्कार केला. मग त्याचे नाव ल्युलिया व्हॉन्च्युअर हिच्याशी जोडले  जातंय. काही महिन्यांपासून सलमान आणि ल्युलियाची जवळीक वाढली होती. त्यामुळे दोघे लग्न करणार असे बोललं जात होते. पुन्हा एकदा लग्नाचा विचार नसल्याचे सलमानने जाहीर केले आणि त्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सलमानवर जीव ओवाळून टाकणा-या तरुणींचे हार्टब्रेक करणारी गोष्ट घडली आहे. कारण सलमानने एक ट्विट केलं आहे आणि ते ट्विट वाचून अनेक तरुणींचे हार्टब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. ‘मुझे लडकी मिल गयी’ असं ट्विट सलमानने केले आहे. भाईजानचे हे ट्विट पाहून त्याच्या लेडी फँन्सना तर धक्काच बसला आहे तर अनेकांना आनंदाचे भरतं आलं आले.अखेरीस सलमानला त्याची लाईफ पार्टनर मिळाली आणि तो लग्न बंधनात अडकणार या विचाराने त्याच्या या ट्विटवर धडाधड कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होऊ लागला आहे. प्रत्येकजण ट्विटला रिप्लाय करताना आपापले कयास लावत त्या मुलीचे नाव सुचवतोय. कुणी कॅटरिनाचे नाव घेतंय तर कुणी ल्युलियाचे. एका यूसरने म्हटलं आहे की भाई, भाभी की फोटो डालो. काहीजण म्हणतायत ही तर एक ब्रेकिंग न्यूज.काहींना सलमानचा हा पब्लिसिटी स्टंट वाटत असून हे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव असावे असे एका यूझरला वाटतंय. एका यूझरने तर चक्क बिग बॉस-11 विजेती शिल्पा शिंदेचा सलमानसोबतचा फोटो टाकून हिच ती तरुणी असल्याचे म्हटले आहे. या ट्विटवर एकाहून एक भन्नाट रिप्लाय येत आहेत. हे ट्विट म्हणजे सलमानने काढलेली खोडी तर ना असाही कयास लावला जात आहे. आता यावर सलमान कधी पडदा उचलणार हे लवकरच स्पष्ट होईल.