Join us

​‘बाहुबली2’च्या प्रत्येक विक्रमासोबत भंगले तमन्ना भाटियाचे स्वप्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2017 8:00 AM

इतिहास रचणाºया सिनेमाचा भाग असणे, हे कुठल्याही कलाकारासाठी वा फिल्ममेकर्ससाठी कमी भाग्याची गोष्ट नाही. अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या करिअरमध्येही अशीच ...

इतिहास रचणाºया सिनेमाचा भाग असणे, हे कुठल्याही कलाकारासाठी वा फिल्ममेकर्ससाठी कमी भाग्याची गोष्ट नाही. अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या करिअरमध्येही अशीच एक संधी आली. ‘बाहुबली’सीरिजच्या या चित्रपटाच्या निमित्ताने तमन्नाला ही संधी मिळाली. पण केवळ इतकेच. यापेक्षा तिच्या हाती काहीच लागले नाही. ‘बाहुबली2’ने तर तमन्नाची पुरती निराशा केली. या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. भारतीय सिनेमाच्या इतिहासात ‘बाहुबली2’सुवर्णाक्षरात आपले नाव कोरले. अनेक जुने विक्रम मोडीत काढत, नव्या विक्रमांवर आपले नाव कोरले. पण तमन्ना या ऐतिहासिक यशाची भागीदार होता होता राहिली. होय, त्यामुळेच ‘बाहुबली2’ नंतर तमन्ना नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत.२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली : दी बिगिनिंग’मध्ये तमन्ना फिमेल लीडमध्ये दिसली होती. महेन्द्र बाहुबलीची भूमिका साकारणाºया प्रभासच्या अपोझिट तिला कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटाने तमन्नाला एक वेगळीच ओळख दिली. यानंतर या चित्रपटाच्या दुसºया भागाकडूनही तमन्नाला मोठी अपेक्षा होती. ‘बाहुबली२’बद्दल ती प्रचंड उत्सूक होती. माझी यातील भूमिका बरीच मोठी आहे, असे तमन्ना सांगत सुटली होती. पण प्रत्यक्षात ‘बाहुबली२’ रिलीज झाला अन् तिची घोर निराशा झाली. कायमेक्सच्या काही मिनिटांच्या रोलमध्येच ती दिसली. दिग्दर्शक राजमौली यांनी तमन्नाच्या भूमिकेला कात्री लावल्याचे नंतर कळले. राजमौलींना चित्रपटाच्या क्वालिटीशी कुठलीही तडजोड करायची नव्हती. त्यामुळेच एडिटींग टेबलवर चित्रपट आला तेव्हा, त्याने कम्प्युटर ग्राफिक्सचे काम चांगले नाहीत, अशी दृश्ये कापून टाकली. दुर्दैवाने ही दृश्ये तमन्नावर चित्रीत होती. परिणामी तमन्ना एडिटींगची बळी ठरली. राजमौली व तमन्नाचे काहीसे बिनसल्यामुळे तिचा रोल कापण्यात आल्याची चर्चाही यानंतर रंगली. ALSO READ : ...या अ‍ॅक्ट्रेसनी साउथच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रोवले झेंडेएकंद काय तर ‘बाहुबली’ हिट झाला. पण ‘बाहुबली2’ने इतिहास रचला. याच इतिहास रचणाºया चित्रपटाची भागीदार बनता बनता तमन्ना चुकली.