Join us

‘भारत’ची बम्पर कमाई, पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 12:27 PM

ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली.

ठळक मुद्दे ‘भारत’मध्ये सलमानसोबत कतरीना कैफ आणि सुनील ग्रोव्हर यांनी केलेल्या कामाचेही कौतुक होत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ‘ट्युबलाईट’ हा सिनेमा  ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. या चित्रपटाद्वारे सलमानने एक नवा प्रयोग केला होता. पण त्याचा हा प्रयोग फसला आणि ईदच्या दिवशी रिलीज होऊनही हा चित्रपट दणकन आपटला. यंदा  ईदच्या मुहूर्ताला प्रदर्शित होणा-या भाईजानच्या ‘भारत’च्या रिलीजपूर्वी चाहते घाबरले होते. ‘भारत’चाही ‘ट्यूबलाईट’ होतो की काय, अशी भीती त्यांना होती. पण यंदाची ईद भाईजानला सुखावणारी ठरली. होय, कारण ‘भारत’ने पहिल्याच दिवशी बम्पर ओपनिंग केली.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘भारत’ने पहिल्या दिवशी ४२.३० कोटींचा गल्ला जमवला. याचसोबत ‘भारत’ हा सलमनाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. २०१० मध्ये सलमानचा ‘दबंग’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १४.५० कोटींची कमाई केली होती. २०११ मध्ये ‘बॉडीगार्ड’ने पहिल्या दिवशी २१. ६० कोटी कमावले होते. २०१२ मध्ये ‘एक था टायगर’ने ३२.९३ कोटी, ‘किक’ने २६.४०, २०१५ मध्ये ‘बजरंगी भाईजान’ने २७.२५ कोटी, २०१६ मध्ये ‘सुल्तान’ने ३६.५४ कोटी, २०१७ मध्ये ‘ट्युबलाईट’ने २१.१५ आणि २०१८ मध्ये ‘रेस 3’ने २९.१७ कोटींची कमाई केली होती. ‘भारत’ने या सगळ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडत पहिल्याच दिवशी ४२.३० कोटींचा बिझनेस केला आहे.

‘भारत’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर ट्वीट करत ट्रेड एक्सपर्ट सुमित कडेल यांनी लिहिले आहे की, ‘भारत’मध्ये ना मोठे अ‍ॅक्शन सीन्स आहेत, ना कुठली शिकवण. केवळ एका संवेदनशील कथेच्या जोरावर ‘भारत’ने सर्वाधिक मोठ्या दुस-या ओपनर चित्रपटाचा किताब आपल्या नावे केला आहे.‘भारत’ या चित्रपटात सलमान पाच वेगवेगळ्या लुक्समध्ये आहे. त्याच्या या लूकची प्रचंड प्रशंसा होतेय. सलमानच्या चित्रपटात अ‍ॅक्टिंग नसते, असे म्हणणा-यांनी हा चित्रपट बघायलाच हवा, अशा अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. ‘भारत’मध्ये सलमानसोबत कतरीना कैफ आणि सुनील ग्रोव्हर यांनी केलेल्या कामाचेही कौतुक होत आहे.

टॅग्स :भारत सिनेमासलमान खानकतरिना कैफ