Join us

पुढच्या वर्षी लवकर या…, लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाली भारती सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 14:15 IST

लाफ्टर क्वीन भारती सिंगनेही दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं. 

गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं. लाफ्टर क्वीन भारती सिंगनेही आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती. भारती सिंगने बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं. 

विसर्जनाच्या आधी झालेल्या गणपती आरतीच्या वेळी भारती भावूक झाली. ओल्या डोळ्यांनी तिने बाप्पाला निरोप दिला. ती म्हणाली, "गेल्या अनेक वर्षांपासून मी बाप्पाची घरी स्थापना करतेय. त्यांना निरोप द्यायला मला अजिबात आवडत नाही.  हा सण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नेहमीच खास राहिला आहे".

 

भारती सिंग आज टीव्हीची कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना तिनं स्वबळावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं.  भारतीचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता.  पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या  बराच स्ट्रगल करावा लागला.

 २००८ मध्ये शोबिज की दुनिया या कार्यक्रमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. यानंतर तिने हर्ष लिंबाचियासोबत लग्न केलं. भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबत अनेक टीव्ही शो होस्ट करताना दिसली. दोघांनीही 'खतरों के खिलाडी' आणि 'नच बलिए' सारख्या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. या दोघांनी एप्रिल 2022 मध्ये मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचे नाव लक्ष्य ठेवले तर 'गोला' हे त्याचे गोंडस टोपणनाव आहे. 

टॅग्स :भारती सिंगबॉलिवूडसेलिब्रिटी