थोडं यश मिळालं की कलाकार हुरळून जातात. आपण काही तरी खूप मोठं केलं आहे, स्टार झालो आहोत अशी भावना त्यांच्यात वाढू लागते. अवघ्या काही दिवसांत स्टारडम आल्यानं आपल्यापुढे इतर व्यक्ती कुणीच नाही असं त्यांना वाटू लागते. मग वाटेल तसे ते वागत असतात. जितक्या वेगाने कलाकार लोकप्रियतेच्या यशशिखरावर पोहचला तितक्याच झटकन ते खालीही फेकले गेले आहेत.असे अनेक कलाकारांनी उदाहरणं आपण पाहिली आहेत.
असाच काहीसा प्रकार घडलाय भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादवबरोबर, खेसारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल. त्याचे झाले असे की, खेसारीच्या गाडीला बसची धडक बसली. यात कोणालाही इजा झाली नाही. पण बसने गाडीला ठोकले म्हणून खेसारीचा संताप अनावर झाला.
त्याने भररस्त्यात बस थांबवली आणि रागाच्या भरात समोरच्या बस चालकाला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरवले. बस चालकाला रस्त्यावर ओढत आणलं. खेसारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच रसिकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.
खेसारी विरोधात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. घडलेल्या संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची चूक होती याविषयी माहिती समोर आलेली नाही. तसेच हा प्रकार मुंबईतील कोणत्या भागात घडला हे ही कळु शकलेले नाही.
ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई! भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या टीकेने कंगनाची सटकली
खेसारी लाल यादवने त्याच्या ऑफिशिअल ट्वीटर हँडवरून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले. यात त्याने कंगना राणौतचे नाव घेत, तिला लक्ष्य केले. शेतकरी आंदोलनाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई! न समझ आवे आम, न बुझाये मूली..अ खाली हर बात पे जुबान खूली... किसान लोगिन के आज सबके साथ के जरूरत बा, सब गोटा मिल के बोलीं: जय जवान-जय किसान! बाकी सब के खेसारी के प्रणाम बा!’