अॅक्टिंग सोडून बिहारात शेती करताहेत हे दोन अभिनेते, हेतू आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:56 PM2019-07-05T12:56:49+5:302019-07-05T13:00:05+5:30
अभिनयात मोठे नाव कमावणा-या या दोन्ही अभिनेत्यांच्या या प्रशंसनीय कामाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामागे त्यांचा खास उद्देश आहे.
भोजपुरी आणि बॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांत नावारूपास आलेला अभिनेता क्रांती प्रकाश झा आणि टेलिव्हिजन स्टार राजेश कुमार हे दोघेही सध्या एकत्र घेऊन शेती करत आहेत. अभिनयात मोठे नाव कमावणा-या या दोन्ही अभिनेत्यांच्या या प्रशंसनीय कामाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बिहारच्या गया येथे क्रांती व राजेश शेती करत आहेत. यामागे त्यांचा खास उद्देश आहे. बिहारातील युवांना स्थलांतरापासून रोखण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
भोजपुरी अभिनेता क्रांती प्रकाश झा मुळचा बिहारचा आहे. भोजपुरी सिनेमात त्याने अपार यश मिळवले. बॉलिवूडमध्येही तो चमकला. आता अॅक्टिंगसोबत तो गावात शेती करतोय. ‘व्यक्तिने आपल्या जन्मभूमीला विसरू नये. मी तेच करतोय. सोबत माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईप्रतीही मी कृतज्ञ आहे,’ असे क्रांती म्हणतो. क्रांती त्याच्या ‘छठी मैया’वरच्या व्हिडीओमुळे कमालीचा लोकप्रिय झाला होता. शहरांत राहूनही आपल्या परंपरा व संस्कृती जपण्याचा संदेश त्याने याद्वारे दिला होता.
क्रांतीने मिथीला माखन, देवसा, वन्स अपॉन अ टाईम इन बिहार अशा भोजपुरी सिनेमांत काम केले आहे. बॉलिवूडच्या एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी शिवाय रामलीला या चित्रपटात तो झळकला आहे.
राजेश कुमारचे म्हणाल तर ‘साराभाई वर्सेज’मध्ये रोसेस भाईची भूमिका साकारून तो लोकप्रिय झाला होता. अलीकडे तो ‘स्टुडंट आॅफ द ईअर 2’मध्ये दिसला होता. राजेशच्या मते, जगाच्या पाठीवर केवळ माणूस नावाचा प्राणी मल्टि टास्किंग करू शकतो. शेती हा व्यवसाय शास्त्रीय व आर्थिक दोन्ही दृष्ट्या फायदेशीर आहे.