Akanksha Dubey Suicide: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 25वर्षांच्या आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(26 मार्च) गळफास घेत आयुष्य संपवलं. आकांक्षाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण समोर आलेलं नाही. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान आता आकांक्षाच्या आत्महत्येप्रकरणी दोन अपडेट्स समोर आले आहेत. मृत्यूपूर्वी काही तास आधी आकांक्षाने इन्स्टा लाईव्ह केलं होतं. यात ती रडताना दिसली होती. अन्य एका अपडेटनुसार, आकांक्षाच्या मृत्यूआधी काही तास आधी तिला सोडण्यासाठी एक व्यक्ती आली होती. ताे तरूण तिच्या हॉटेलच्या रूममध्येही गेला होता.आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट रेखा मौर्याने केलेल्या खुलाशानुसार, आकांक्षा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या पार्टीत ती अतिशय आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नव्हता. पार्टी संपल्यानंतर ती तिच्या हॉटेलकडे निघाली होती.
'तो' तरुण कोण? आकांक्षा रात्री उशीरा 1.55 वाजता हॉटेलवर परतली होती. हॉटेल मॅनेजरनेने दिलेल्या माहितीनुसार, तिला सोडण्यासाठी एक तरुण तिच्यासोबत आला होता. तो आकांक्षासोबत तिच्या खोलीत गेला. 17 मिनिटे तो आकांद खोलीत थांबला होता. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडला. त्या 17 मिनिटांत नेमकं काय झालं, याचा पोलिस शोध घेत आहे.आकांक्षा दुबेच्या खोलीचा दरवाजा सकाळी उघडला, तेव्हा लाईट देखील चालू होती आणि बाथरूमचा नळही उघडा होता.
ढसाढसा रडली होती...आकांक्षाने आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होतं. यावेळीचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. ती तोंडावर हात ठेवून ढसाढसा रडत असल्याचंही यात दिसत आहे. अनेक चाहत्यांनी तिला रडण्यामागचे कारण कमेंट करत विचारलं. मात्र ती त्यावर काहीही बोलली नाही. चार वर्षापूर्वी म्हणजेच 2018 साली आकांक्षाने नैराश्यामुळे फिल्मी करियरला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार होती. मात्र, त्याआधीच तिने स्वत:ला संपवलं.