मलाइका, बिपाशाला बघून ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; आता बनविणार असा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 10:33 AM
भोजपुरी चित्रपट आणि अल्बममधून आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री आणि गायिका चांदनी सिंग हिने एक मोठा निर्णय घेतला ...
भोजपुरी चित्रपट आणि अल्बममधून आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री आणि गायिका चांदनी सिंग हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. चांदनीने हा निर्णय अभिनेत्री सुष्मिता सेन, मलाइका अरोरा आणि बिपाशा बसू यांना प्रेरित होऊन घेतला आहे. आता तुम्ही विचार करीत असाल की चांदनी नेमके काय करणार आहे बरं. तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, चांदनी सिंग यू-ट्यूब सेन्सेशन असून, याचाच फायदा घेऊन ती सुष्मिता, मलाइका आणि बिपाशाप्रमाणे एक व्हिडीओ तयार करणार आहे. असे म्हटले जात आहे की, चांदनी सध्या तिच्या फिटनेसवर अधिक लक्ष देत आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दररोज जिममध्ये वर्कआउट करण्यावर भर देत आहे. मात्र त्याचबरोबर तिला असे वाटत आहे की, सुष्मिता सेन, मलाइका अरोरा आणि बिपाश बसूप्रमाणे वर्कआउटचा व्हिडीओ काढून तो आपल्या चाहत्यांशी शेअर करावा. चांदनीला तिचे वर्कआउट करतानाचे काही सीन्स तिच्या चाहत्यांना दाखवायचे आहेत. त्यासाठी ती खास प्लॅनिंग करीत असल्याचे समजते. वास्तविक चांदनीने अद्यापपर्यंत आपल्या वर्कआउटचा व्हिडीओ बनविला नाही. मात्र लवकरच ती अशाप्रकारचे काही व्हिडीओ तयार करून यू-ट्यूबवर अपलोड करणार आहे. खरं तर यू-ट्यूबवर चांदनीचे एवढे चाहते आहेत की, तिच्या प्रत्येक व्हिडीओला लाखोंच्या संख्येने बघितले जाते. अशात तिचा वर्कआउट करतानाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर धूम उडवून देईल यात शंका नाही. ‘डोली में गोली मारदेब, चोंए चोंए आणि खोद देव ढोढी पिचकारी’ यासारख्या चांदनीच्या म्युझिक व्हिडीओंनी यू-ट्यूबवर धूम उडवून दिली आहे. तिचे हे सर्वच व्हिडीओ हिट झाले आहेत. तिचे नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले ‘मरद हमके भूल गईलू’ हे गाणे इंटरनेटवर धूम उडवून देत आहे. या गाण्याला आतापर्यंत सहा कोटींपेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे. अशात तिच्या वर्कआउट करतानाच्या व्हिडीओची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.