भोजपुरी गायक अभिषेक उर्फ बाबुल बिहारीला (Babul Bihari) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी काल अटक करण्यात आली. बिहारचा राहणारा बाबुल बिहारी याने सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले. सध्या पोलिस याचा तपास करत आहेत. तर पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं. तेव्हा १३ वर्षांच्या मुलीने सर्व घटनाक्रम सांगितला.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, ही दोन वर्षांपूर्वीची घटना आहे. गायक बाबुल बिहारीने १३ वर्षांच्या मुलीचं मन वळवून तिला राजीव नगर येथील एका हॉटेलमध्ये बोलावलं. तिथे त्याने मुलीसोबत अत्याचार केले. इतकंच नाही तर तिचे फोटोही काढले. या घटनेनंतर पिडीत महिला त्याच्यापासून दूर राहू लागली. पीडितेच्या कुटुंबाला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती.
दोन वर्षांनंतर बाबुल बिहारीने सोशल मीडियावर ते फोटो पोस्ट केले. पीडितेच्या कुटुंबाने जेव्हा हे फोटो पाहिले तेव्हा त्यांनी मुलीला प्रश्न विचारला. तेव्हा तिने दोन वर्षांपूर्वीची घटना सांगितली. यानंतर तिचे आईवडील पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बाबुल बिहारीला अटक केली. त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल झाला. लवकरच त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.