दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कमेंट्स करणे अभिनेत्री कंगना राणौतला चांगलेच महागात पडलेय. या कमेंटमुळे कंगनाला चौफेर टीकेचा सामना करावा लागतोय. बॉलिवूड व पंजाबी कलाकारांनी कंगनाचा खरपूस समाचार घेतला असताना आता भोजपुरी स्टार्सही कंगनावर संतापले आहेत. भोजपुरीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव याने तिच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
खेसारी लाल यादवने त्याच्या ऑफिशिअल ट्वीटर हँडवरून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले. यात त्याने कंगना राणौतचे नाव घेत, तिला लक्ष्य केले. शेतकरी आंदोलनाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘ए भाई, ई कंगना के कुछ न बुझाई! न समझ आवे आम, न बुझाये मूली..अ खाली हर बात पे जुबान खूली... किसान लोगिन के आज सबके साथ के जरूरत बा, सब गोटा मिल के बोलीं: जय जवान-जय किसान! बाकी सब के खेसारी के प्रणाम बा!’
कंगनाचा जळफळाट
खेसारीच्या या ट्वीटनंतर कंगनाचा किती जळफळाट झाला, असावा याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. खेसारीच्या या ट्वीटवर कंगनाने लगेच रिप्लाय दिला. ‘तुला काय म्हणायचे आहे? मी आता देशात सर्वात मोठे लक्ष्य आहे? मला लक्ष्य केल्याने तू मीडियाचा आवडता बनशील? मुव्ही माफिया तुला चित्रपट ऑफर करतील? तुला फिल्मफेअर अवार्ड, शिवसेनेचे तिकिट आणि सर्वकाळी मिळेल? मी डॉन असती तर 73 मुल्कांचे पोलिस माझ्या मागे पडले असते,’ असे ट्वीट कंगनाने केले.
मीका सिंहचा ड्रामा क्वीन कंगनाला सल्ला, 'अॅक्टिंग कर, इतकी देशभक्त कधीपासून जागी झाली'
आता कॉंग्रेस खासदारानं कंगनाला डिवचलं, म्हणाले - 'हिमाचलचं सडलेले सफरचंद'
कंगनाने जेव्हापासून शेतकरी आंदोलनावर ट्विट केले तेव्हापासून ती वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल होते आहे. आधी तर केवळ कंगना आणि अभिनेता दिलजीत दोसांझमध्ये वाद सुरू झाला होता. आता यात अनेक सेलिब्रिटी आले आहेत. अनेकजण कंगनाच्या वक्तव्याचा विरोध करत आहे आणि तिला भाषेवर संयम ठेवण्याचा सल्ला देत आहेत.