Bholaa Advance Booking: ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं नाव आहे, भोला. अजय देवगणच्या (Ajay Devgn) या सिनेमाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजयचा ‘दृश्यम २’ सुपर डुपर हिट झाला होता. ‘दृश्यम २’ नंतर अजयचा ‘भोला’ येतोय म्हटल्याचा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. बॉक्स ऑफिसवरही ‘भोला’ धमाका करणार, असं वाटतंय. कारण ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत आणि हे आकडे सुखावणारे आहेत.रविवारपासून ‘भोला’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं. अजयने स्वतः तब्बूसोबतचा एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘भोला’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आणि पहिल्या २-३ तासांतच १२०० हून अधिक तिकिटं विकली गेली. या ॲडव्हान्स बुकिंगमधूनच ‘भोला’पे ७ लाखांहून अधिक कमाई केली आहे. अजयचा हा सिनेमा रिलीज व्हायला आणखी ९ दिवसांचा वेळ आहे. अशात ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईचा आकडा आणखी वाढू शकतो.
‘भोला’ ३० मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सिनेमात अजय देवगण व तब्बू मुख्य भूमिकेत आहेत. अजयने स्वत: सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला होता त्यात साऊथ स्टार कार्थी मुख्य भूमिकेत होता. २५ कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कैथी’ने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा बिझनेस केला होता. आता याचाच रिमेक असलेला अजयचा ‘भोला’ किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘भोला’चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.