Bholaa Starcast Fees : अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘भोला’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या ‘भोला’ची जबदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही याच सिनेमाची चर्चा आहे. सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त हिट झाल्यानंतर आता ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय व तब्बू (Tabu) पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. दोघंही चित्रपटात धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहेत. अजय देवगण आणि तब्बू यांच्याशिवाय संजय मिश्रा, किरण कुमार, अमला पॉल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सगळ्यांनी ‘भोला’साठी तगडी रक्कम वसूल केल्याचं कळतंय.
सर्वप्रथम अजयच्या फीबद्दल बोलू. अजय या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये अजय जबरदस्त ॲक्शन करताना दिसतोय. हा सिनेमा स्वत: अजयने दिग्दर्शित केला आहे. अशात त्याच्या मानधनाची चर्चा तर होणारच. चर्चा खरी मानाल तर या चित्रपटासाठी अजयने ३० कोटी मानधन घेतलं आहे.तब्बूचं म्हणाल तर ती ‘भोला’ या चित्रपटात एका तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. याआधी दृश्यम २ मध्ये देखील तब्बू व अजय देवगण एकत्र दिसले होते. ‘भोला’ या सिनेमासाठी तब्बूने म्हणे ४ कोटी रूपये घेतले आहेत.
आपल्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा ‘भोला’मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांचं कॅरेक्टर फारच मजेशीर असणार आहे. या सिनेमासाठी संजय मिश्रा यांनी ८५ लाख रूपये घेतल्याची चर्चा आहे.
अमाला पॉल या सिनेमात अजय देवगणसोबत राेमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिने २५ लाख घेतल्याची चर्चा आहे.
‘भोला’ येत्या ३० मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला होता त्यात साऊथ स्टार कार्थी मुख्य भूमिकेत होता. २५ कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या ‘कैथी’ने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींचा बिझनेस केला होता. आता याचाच रिमेक असलेला अजयचा ‘भोला’ किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.