अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा त्याच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणजेच 'भूल भुलैया'च्या तिसऱ्या भागासह परत आला आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यावेळी रुह बाबा सोबत माधुरी दीक्षित आणि विद्या बालन देखील आहेत. रुह बाबानं आपल्या जादूनं अख्खं बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कार्तिकचा 'भूल भुलैया 3' वेगानं पुढे सरकत आहे.
'भूल भुलैया 3' पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. पण, असेही काही आहेत, जे घरी बसून ओटीटीवर सिनेमा पाहायला जास्त पसंती देतात. त्यामुळे 'भूल भुलैया 3' कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागली आहे. 'भूल भुलैया 3' च्या ओटीटी रिलीजशी संबंधित एक मोठे अपडेट आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Netflix ने 'भूल भुलैया 3' चे OTT अधिकार विकत घेतले आहेत. याचा अर्थ अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट Netflix वर प्रदर्शित केला जाईल. चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, सामान्यतः हिंदी चित्रपट हे दीड ते दोन महिन्यांत ओटीटीवर येतात. अशा परिस्थितीत 'भूल भुलैया 3' डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.
'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी अशी तगडी स्टार कास्ट आहे. 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. विशेष म्हणजे, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर सिंघम अगेन सोबत संघर्ष असूनही कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडीनं 35.5 कोटी रुपयांच्या कमाईसह भारतात आपलं खातं उघडलं. कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चं बजेट जवळपास 150 कोटी रुपये आहे.