'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांची चर्चा आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर हे दोन्ही सिनेमे रिलीज झाले. या वर्षातील बहुचर्चित सिनेमे म्हणून 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची चर्चा होती. 'सिंघम अगेन' याआधी १५ ऑगस्टला रिलीज होणार होता. परंतु दिवाळीच्या मुहुर्तावर 'सिंघम अगेन' रिलीज झाला. या सिनेमासमोर कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'चं तगडं आव्हान होतंं. परंतु आता लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट बघता कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला मात दिल्याचं कळतंय.
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
कोणत्याही सिनेमाचा सोमवारचा दिवस महत्वाचा असतो. कारण वीकेंड उलटून गेल्यावर येणाऱ्या सोमवारी सिनेमा किती कमाई करेल त्यावर सिनेमाचं भवितव्य अवलंबून असतं. सेकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' यांच्या कमाईत सोमवारी लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि विशेष गोष्ट म्हणजे 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' यांनी १७.५० कोटींची समान कमाई केल्याचं दिसतंय. परंतु बजेटच्या आणि लोकप्रियतेच्या तुलनेत 'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला चांगलीच मात दिल्याचं समजतंय.
कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरतोय सरस
'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन' या दोन सिनेमांकडे नजर टाकली तर 'सिंघम अगेन'मध्ये अनेक सुपरस्टार होते. तरीही सिनेमा हवा तसा यशस्वी ठरताना दिसत नाहीय. तर दुसरीकडे 'भूल भूलैय्या ३'ने माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर लोकांची गर्दी खेचण्यात यश मिळवलंय. कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित या त्रिकूटाची रहस्यमयी कहाणी प्रेक्षकांना आवडतेय. त्यामुळे 'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला चांगलीच मात दिली असं म्हणता येईल.