Join us

अभिनेत्री भूमीने घेतले कुलदेवीचे दर्शन, सांगितला पेडणेकर आडनावाचा 'तो' इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 3:30 PM

अभिनेत्री भूमी पेडणेकरने 'दम लगा के हईशा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अभिनेत्री भूमी पेडणेकरने 'दम लगा के हईशा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  ल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया, सांड का आँख व पति पत्नी और वो यासारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. भूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भूमी सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी संवादही साधत असते. रुपेरी पडद्यावर भूमीचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज आपण पाहिला आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती. 

कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणी शूटिंग अजून सुरु केलेल नाही. त्यामुळे भूमी सध्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. भूमी गोव्यात आपल्या गावाला गेली आहे. आज सकाळी भूमीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. याफोटोच्या माध्यमातून भूमीने आपल्या गावाबाबत माहिती दिली. भूमीच्या गावाचं नाव पेडणे आहे, याठिकाणी तिचे कुलदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात तिचे वडिलोपार्जित घरदेखील आहे. आपल्या गावाचे फोटो शेअर करताना भूमीने सांगितले की, 'आमच्या गावाचं नाव पेडणे असं आहे. हे मंदिर तीन मंदिरांना जोडून बांधले गेले आहे. ज्यात माऊली देवी मंदिर, भगवती देवी मंदिर आणि रवळनाथ मंदिर आहे.'

भूमीने पोस्टमध्ये या मंदिरांचा इतिहासाबाबत देखील सांगितले आहे, ''हे मंदिर 300 ते 400 वर्षे जुने आहे. 1902 मध्ये रवळनाथ मंदिराच्या पुस्तकामध्ये पेडणेकरांचा उल्लेख केला आहे. मंदिराच्या भोवताली असलेलं पाणी हे औषधासारखं काम करते. जे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.'' भूमीने सांगितले की, ''ती जेव्हाही इथं दर्शनासाठी तेव्हा खूप काही शिकवून जाते.'' भूमीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच पसंत पडते आहे.  

टॅग्स :भूमी पेडणेकर