Join us

भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर, चाहते करतायेत तिच्या कामाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:55 PM

Bhumi Pednekar becomes Climate Warrior:आम्ही बऱ्याच ऑन ग्राऊंड एक्टिव्हिटी केल्या आणि हवामान बदलाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माझ्या सोशल मीडियाचा बराच वापर केला."

 बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक मतं मांडण्यातही ती पुढे असते. काही दिवसांपूर्वीच  भूमी पेडणेकरला करोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर  लगेचच  तिने एक छोटीशी मोहीम राबवण्याचं ठरवलं. जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करणारे लोक, औषधे पुरवणारे या सर्वांना लोकांशी जोडून देण्याचा प्रयत्न ती करत आहे.त्याचबरोबर तिने करोनाच्या या दुसऱ्या लाटेला गांभीर्याने घेण्याची विनंती केली होती. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आत्मसात करण्याची गरज असल्याचे ती म्हणते.

 

 ती म्हणते, "2020 मध्ये काहीच काम नसल्यामुळे महिनाभर तर मी फक्त बसून घालवला, पण मला वाटतं त्यानंतर मी बरीच मेहनत घेतली. त्यानंतर मी आत्मशोधाचा मार्ग पत्करला आणि मी आयुष्य कशा पद्धतीने जगतेय यात बरेच बदल केले. मी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले - मी शाकाहारी झाले आणि अनेक गोष्टी सोडून दिल्या. आपण निसर्गाच्या अधिक जवळ जायला हवं आणि या समस्यांबद्दल आवाज उठवायला हवा, हे माझ्या लक्षात आलं."

 भूमी सांगते की हा मोकळा वेळ तिने क्लायमेट वॉरिअर या तिच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमावर भर देण्यासाठी वापरला. ती म्हणाली, "क्लायमेट वॉरिअर या पृथ्वीवर प्रेम करण्याची प्रेरणा देणाऱ्या माझ्या उपक्रमाचं मी बरंच काम केलं. हवामानातील बदल प्रत्यक्षात येत आहेत हे मी लोकांना सांगितलं. आम्ही बऱ्याच ऑन ग्राऊंड एक्टिव्हिटी केल्या आणि हवामान बदलाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माझ्या सोशल मीडियाचा बराच वापर केला."

 भूमी पुढे म्हणाली, "मी अगदी निरागस मुलगी होते. सगळं पाणी संपून गेलं तर काय करावं या भीतीने लहानपणी मी कित्येक रात्री जागून काढल्यात. मला वाटायचं एका खोलीत अनेक बाटल्या पाण्याने भरून ठेवूया. पण मोठं झाल्यानंतर हा मूर्खपणाचा विचार आहे, हे लक्षात आलं. आताची पिढी हुशार आहे. वेळ पटापट हातातून निघून जातोय हे सांगण्यात, पटवून देण्यात ते आघाडीवर आहेत."

टॅग्स :भूमी पेडणेकर कोरोना वायरस बातम्या