बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) तिच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखली जाते. 'दम लगा के हैशा', 'बधाई दो', 'टॉयलेट एक प्रेम कथा' असे तिचे अनेक चित्रपट गाजले. एकीकडे अभिनयाचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे तिला तिच्या फॅशन सेन्सवरुन खूप ट्रोल केलं जातं. नुकतीच ती एका इव्हेंटसाठी आली असता तिची स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं आहे.
भूमी पेडणेकरने काल मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी ती रेड कार्पेटवर आली असता सगळ्यांच्याच नजरा तिने घातलेल्या ड्रेसकडे होत्या. तिचा लूक पाहून सर्वच चकीत झाले. तिने व्हाईट रंगाचा एथनिक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा ब्लाऊज अगदीच अतरंगी दिसत आहे. ट्रान्सपरंट प्लॅस्टिकचा हा ब्लाऊज आहे. तर याच्या दोन्ही बाजूला सापाचा आकार आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप ट्रोल होतोय.
नेटकऱ्यांना भूमीचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. सोशल मीडियावर तिला चांगलंच सुनावण्यात येत आहे. 'उर्फीकडून प्रेरणा घेतली का?','हिच्याहून चांगलं तर उर्फीचा ड्रेसिंग सेन्स आहे','बुलेट प्रुफ नागिन','हे काय घातलंय हिने' असं म्हणत भूमीची खिल्ली उडवण्यात आली आहे.
भूमीचा 'भक्षक' थ्रिलर सिनेमा यावर्षी रिलीज झाला. यापुढे तिच्या एकाही प्रोजेक्टची अद्याप घोषणा झालेली नाही. सध्या ती केवळ तिच्या लूक्समुळे, वेटलॉसमुळे चर्चेत असते.