अभिनयात पदार्पण केल्यापासून आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar)ने हिंदी सिनेसृष्टीत आपलं एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मागच्या वर्षी भूमी पेडणेकरचे 'भीड', 'अफवाह', 'थँक यू फॅार कॅालिंग' आणि 'लेडी किलर' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यंदा तिचे 'भक्षक' आणि 'मेरी पत्नी का रिमेक' हे दोन सिनेमे बॅाक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत, पण भूमी पेडणेकरला मात्र डिजिटलचे वेध लागले आहेत.
भूमी पेडणेकर सध्या डिजिटल प्रोजेक्टच्या शोधात आहे. याबाबत ती म्हणाली की, जागतिक स्तरावर तसेच भारतात स्ट्रीमिंग कंटेंटची लोकप्रियता अविश्वसनीय आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून मी डिजिटलवर एन्ट्री करण्याचा विचार करत आहे, परंतु स्ट्रीमिंगवर माझं पदार्पण रोमांचक तसंच लक्षवेधी असावं असंही मला वाटतं. आजवर केलेल्या चित्रपटांपेक्षा ते काहीतरी वेगळं आणि भन्नाट असायला हवे.
ती पुढे म्हणाली की, "एक प्रेक्षक म्हणून, मला खरोखर विश्वास आहे की प्लॅटफॉर्म आणि त्यांनी मांडलेला आशय देखील चांगला आहे. एक लांबलचक स्वरूप एखाद्या कलाकाराला त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये खऱ्या अर्थाने राहण्याची आणि खरोखरच प्रतिष्ठित असू शकेल असे काहीतरी तयार करण्याची संधी देते. मी बर्याच शोजची फॅन आहे आणि समोर येणाऱ्या सर्व कंटेंटची मी प्रेक्षक आहे. मी सकारात्मक आहे की मला काहीतरी सापडेल ज्यावर माझा विश्वास आहे.” भूमी पेडणेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती थँक यू फॉर कमिंग चित्रपटात झळकली. त्यानंतर आता ती रेडचिलीजच्या भक्षक आणि मुदस्सर अजीजच्या मेरे हसबंड की बीवीमध्ये दिसणार आहे.